Sushant Singh Rajput death case: "मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बॉलिवूड माफियांच्या दबावाखाली"
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2020 08:45 AM2020-08-02T08:45:25+5:302020-08-02T08:48:44+5:30
सुशीलकुमार मोदी यांनी यासंदर्भात ट्विट करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केला आहे.
नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी महाराष्ट्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. तसेच, या प्रकरणात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काँग्रेस आणि बॉलिवूडमधल्या माफियांच्या दबावाखाली आहेत, असा गंभीर आरोप सुशीलकुमार मोदी यांनी केला आहे.
सुशीलकुमार मोदी यांनी यासंदर्भात ट्विट करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केला आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर काँग्रेस आणि बॉलिवूड माफियांचा दबाव आहे. त्यामुळे सुशांतच्या प्रकरणात जबाबदार असलेल्या सर्व घटकांना वाचवण्यासाठी कल दिला जातो आहे, असे म्हणत काँग्रेस बिहारमधील जनतेला काय तोंड दाखवणार? असा सवाल सुशीलकुमार मोदी यांनी उपस्थित केला आहे.
याचबरोबर, सुशांतच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुंबईत पोहोचलेल्या बिहार पोलिसांच्या तपासात अडथळा आणल्याचा जात आहे, असा आरोपही सुशीलकुमार मोदी यांनी केला आहे. बिहार पोलीस सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. मात्र, मुंबई पोलीस सहकार्य करीत नाहीत. भाजपाला वाटते की, हे प्रकरण सीबीआयने हाताळले पाहिजे, असे सुशीलकुमार मोदींनी म्हटले आहे.
दरम्यान, सुशांत सिंह राजपूत याने १४ जून २०२० रोजी मुंबईतील घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या निधनाने बॉलिवूड इंडस्ट्रीलाही धक्का बसला. मात्र, बॉलिवू़डमधील घराणेशाही आणि गटबाजीमुळे सुशांतचा बळी गेला, असा आरोप सुरुवातीला झाला. असा आरोप झाल्यानंतर मुंबई पोलिसांकडून त्या अनुषंगानेही तपास सुरू आहे.
आणखी बातम्या....
दिग्गजांचे ट्विटर अकाउंट्स हॅक करणाऱ्या १७ वर्षीय मुलानं एका दिवसांत कमावले १ लाख डॉलर
Article 370: ...म्हणून 5 ऑगस्ट हा आमच्यासाठी ऐतिहासिक नव्हे, काळा दिवस; मुफ्तींच्या लेकीची टीका
लवकरच सात नवीन Bullet Trains सुरू होणार; कोणत्या शहरांमध्ये धावणार, जाणून घ्या...
CoronaVirus News : कोरोना व्हायरसच्या लसीवरून राजीव बजाज यांचं मोठं विधान, म्हणाले...
CoronaVirus News : कोरोना व्हायरस पाण्यामुळे मरतो, रशियन शास्त्रज्ञांचा दावा