मोठी बातमी! सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआय करणार; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2020 11:12 AM2020-08-19T11:12:08+5:302020-08-19T11:24:45+5:30

Sushant Singh Rajput Case SC Order CBI Investigation: सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

Sushant Singh Rajput death case Supreme Court orders CBI investigation | मोठी बातमी! सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआय करणार; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

मोठी बातमी! सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआय करणार; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

Next

नवी दिल्ली: अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं सीबीआयला दिले आहेत. मुंबई पोलिसांनी सीबीआयला सहकार्य करावं, अशा सूचनादेखील न्यायालयानं केल्या आहेत. सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयनं करावा, अशी मागणी त्याच्या कुटुंबीयांनी केली होती. 




सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास पाटणा पोलिसांऐवजी मुंबई पोलिसांकडून करण्यात यावा, अशी याचिका सुशांतची प्रेयसी आणि अभिनेत्री रिया चक्रवर्तीनं केली होती. त्यावर न्यायालयानं आपला निकाल राखून ठेवला होता. हा निकाल न्यायालयानं आज सुनावला. सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयनं करावा आणि मुंबई पोलिसांनी त्यांना सहकार्य करावं, असं न्यायालयानं निकालात म्हटलं. 




सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या तपासात महाराष्ट्र सरकारनं सहकार्य करावं. भविष्यात सर्वोच्च न्यायालयानं सुशांतशी संबंधित सर्व प्रकरणांचा तपास आपल्या हाती घ्यावा, अशी सूचना न्यायालयानं केली. 'सीबीआय केवळ पाटण्यातील एफआयआरचा तपास करण्यासच सक्षम नाही, तर या प्रकरणाशी संबंधित आणखी गुन्हे दाखल झाल्यास त्यांचा तपासदेखील सीबीआय करेल,' असं न्यायालयानं निकाल देताना म्हटलं.




सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाच्या तपासाचा अधिकार नेमका कोणाला, यावर आज सर्वोच्च न्यायालय निकाल देणार होतं. सर्वोच्च न्यायालयानं सर्व पक्षकारांकडून लिखित उत्तरं मागवली होती. मागील सुनावणीत सर्वोच्च न्यायालयानं दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून घेतले. रिया चक्रवर्तीचे वकील श्याम दिवाण, बिहार सरकारचे वकील मनिंदर सिंह, महाराष्ट्र सरकारचे वकील अभिषेक मनु सिंघवी, सुशांतचे वडिलांचे वकील विकास सिंह, केंद्र सरकार महाधिवक्ते तुषार मेहता यांच्या बाजू ऐकून घेतल्या. त्यानंतर न्यायालयानं आपला निर्णय राखून ठेवला होता.

Read in English

Web Title: Sushant Singh Rajput death case Supreme Court orders CBI investigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.