Sushant Singh Rajput Death Case: सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाआधी सुशांतच्या बहिणीचं ट्विट; श्रीकृष्ण-अर्जुनाचा फोटो शेअर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2020 09:54 AM2020-08-19T09:54:33+5:302020-08-19T10:01:54+5:30
Sushant Singh Rajput Death Case: रिया चक्रवर्तीच्या याचिकेवर न्यायालय आज निकाल देण्याची शक्यता
नवी दिल्ली: अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात थोड्याच वेळात सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी होणार आहे. सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास नेमका कोणी करायचा, याबद्दल न्यायालय आजच निकाल देण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुशांतचे कुटुंबीय आणि चाहते यांचं लक्ष न्यायालयाच्या निकालाकडे लागलं आहे. सुशांतच्या कुटुंबीयांनी सीबीआय तपासाची मागणी केली आहे. न्यायालयाच्या निकालाआधी सुशांतची बहिण श्वेतानं महाभारतामधील एक फोटो ट्विट केला आहे. देव आमच्यासोबत आहे, असं श्वेता यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास नेमका कुणी करायचा याबद्दल आज सर्वोच्च न्यायालय निकाल देण्याची शक्यता आहे. सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्तीनं हा तपास मुंबई पोलिसांकडूनच करण्यात यावा अशी मागणी केली आहे. तर सुशांतच्या कुटुंबीयांनी सीबीआय तपासाची मागणी लावून धरली आहे. सुशांतची बहिण श्वेता यांनी ट्विट केलेल्या फोटोत श्रीकृष्ण रथाचं सारथ्य करताना, तर अर्जुन धनुष्यबाण चालवत असताना दिसत आहे. 'आम्हाला अंधारातून प्रकाशाकडे न्या. शरणागती', असं श्वेता यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
Lead Us from darkness unto LIGHT! Sharnagati 🙏 #GlobalPrayers4SSR#Godiswithuspic.twitter.com/e4FlE89EOP
— shweta singh kirti (@shwetasinghkirt) August 19, 2020
सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात रिया चक्रवर्तीनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सुशांतचे वडील के. के. सिंह यांनी पाटण्यात एफआयआर दाखल केला. त्यानंतर बिहार पोलीस मुंबईत तपासासाठी दाखल झाले. बिहार सरकारनं सीबीआयची चौकशीची मागणी केल्यानंतक सीबीआयनंदेखील तपास सुरू केला. मात्र महाराष्ट्र सरकारनं याला विरोध दर्शवला. मुंबई पोलीस तपास करण्यास सक्षम असल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं.
सर्वोच्च न्यायालयानं निकाल राखून ठेवला
सर्वोच्च न्यायालयानं मागील सुनावणीत दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून घेतले. रिया चक्रवर्तीचे वकील श्याम दिवाण, बिहार सरकारचे वकील मनिंदर सिंह, महाराष्ट्र सरकारचे वकील अभिषेक मनु सिंघवी, सुशांतचे वडिलांचे वकील विकास सिंह, केंद्र सरकार महाधिवक्ते तुषार मेहता यांच्या बाजू ऐकून घेतल्या. त्यानंतर न्यायालयानं आपला निर्णय राखून ठेवला.
अखेर मंत्री आदित्य ठाकरेंबद्दल रिया चक्रवर्तीनं मौन सोडलं; म्हणाली...
मौन हा माझा कमकुवतपणा नाही; सत्य बदलत नाही- रिया चक्रवर्ती
...तर सीबीआय चौकशी करावी; सुशांत प्रकरणात काँग्रेसच्या मंत्र्याची शिवसेनेविरोधात भूमिका
सीबीआय की पोलीस? आज फैसला, न्यायालय निर्णय देणार