Sushant Singh Rajput Suicide : "आमचा महाराष्ट्र पोलिसांवर विश्वास नाही, न्यायालयीन चौकशी केली जावी"
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2020 12:27 PM2020-06-15T12:27:18+5:302020-06-15T12:27:42+5:30
Sushant Singh Rajput Suicide : 'सुशांत आत्महत्या करणं शक्य नाही. यासंदर्भात काहीतरी नक्कीच चुकीचं घडल्याची आम्हाला शंका आहे.'
अभिनेता सुशांत सिंह राजपूतने रविवारी आत्महत्या केली. त्याच्या अशा जाण्याने सर्वांनाच धक्का बसला. आत्महत्येमागचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. नैराश्यातून सुशांतने टोकाचं पाऊल उचललं असावं, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. सुशांतच्या आत्महत्येने त्यांच्या चाहत्यांसोबतच कुटुंबियांनाही मोठा धक्का बसला आहे. सुशांत आत्महत्या करू शकत नाही. या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्याच्या नातेवाईकांनी केली आहे. याच दरम्यान सुशांतच्या मामाने महाराष्ट्र पोलिसांवर आमचा विश्वास नाही. केंद्रीय संस्थेच्या माध्यमातून या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी केली जावी असं म्हटलं आहे.
'सुशांत आत्महत्या करणं शक्य नाही. यासंदर्भात काहीतरी नक्कीच चुकीचं घडल्याची आम्हाला शंका आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी. महाराष्ट्र पोलिसांवर आमचा विश्वास नाही' असं माध्यमांशी संवाद साधताना सुशांतच्या मामाने म्हटलं आहे. तसेच 'सुशांत हा अतिशय हुशार, देशाबद्दल, समाजाबद्दल प्रेम असणारा कलाकार होता. तो आत्महत्या करू शकत नाही. आम्ही सर्व वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून मागणी करतो की सरकारने या प्रकरणाची न्यायलयीन चौकशी करावी. त्याचे देशावर आणि समाजावर प्रेम होते. त्याचं काम उत्तम सुरू होतं. महाराष्ट्र पोलिसांवर आमचा विश्वास नाही. मी गृहमंत्र्यांकडे मागणी करतो की याची केंद्रीय संस्थेच्या माध्यमातून न्यायालयीन चौकशी केली जावी' अशी मागणीही त्यांनी केली आहे.
We don’t think he committed suicide, police must investigate the matter. There seems to be a conspiracy behind his death. He has been murdered: Maternal uncle of #SushantSinghRajput, outside Sushant's residence in Patna, Bihar. (14.06.2020) pic.twitter.com/aUO80KNZdf
— ANI (@ANI) June 15, 2020
'कालपर्यंत एक तरुण रिअॅलिटी शोमध्ये नाचत होता तो अचानक असा निर्णय घेईल का? नाही घेणार. रोज तो त्याच्या वडिलांशी बोलत होता, कुटुंबाशी बोलायचा. आम्हाला संशय आहे. यामध्ये काहीतरी चुकीचं असल्यासारखं आम्हाला वाटत आहे. पंतप्रधान मोदींकडे मी मागणी करतो की देशाने एक राष्ट्रवादी पुत्र गमावला आहे. तो देशासाठी आणि तुमच्या मदतीसाठीही कायम उभा राहायचा. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी केली जावी अशी मी मागणी करतो' असं देखील सुशांतच्या मामाने म्हटलं आहे. एका हिंदी वृत्तवाहिनीने याबाबतचे वृत्त दिले आहे.
Sushant Singh Rajput Suicide : सुशांतचे फोटो पोस्ट करताना सावधानhttps://t.co/T9As5VVqcR#SushanthSinghRajput#SushantSingh#SushantNoMore#sushant
— Lokmat (@MiLOKMAT) June 15, 2020
सुशांतच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. मात्र पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशांतवर मानसोपचार सुरू होते. त्याबद्दलची काही कागदपत्रंदेखील त्याच्या घरात पोलिसांनी सापडली. त्यामुळे नैराश्यातून त्याने टोकाचं पाऊल उचललं असावं, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. याच दरम्यान एका माजी खासदाराने धक्कादायक विधान केलं आहे. सुशांतची हत्या करण्यात आल्याचं म्हटलं आहे.
Sushant Singh Rajput Suicide : सुशांतच्या मृत्यूची सीबीआयकडून चौकशी करण्याची मागणीhttps://t.co/d78tOHw27X#SushantSinghRajput#SushantNoMore#SushantSingh#sushant
— Lokmat (@MiLOKMAT) June 15, 2020
महत्त्वाच्या बातम्या
Sushant Singh Rajput Suicide: सुशांतचे 'ते' फोटो पोस्ट करत असाल, तर....; सायबर सेलचा कडक इशारा
Sushant Singh Rajput Suicide: "सुशांत आत्महत्या करू शकत नाही, त्याची हत्या करण्यात आली आहे"
CoronaVirus News : दिलासादायक! घरच्या घरीही करता येणार कोरोनावर मात; डॉक्टरांनी दिला मोलाचा सल्ला
CoronaVirus News : अरे व्वा! तब्बल 18 दिवस व्हेंटिलेटरवर असलेल्या बाळाने जिंकली कोरोनाची लढाई