सुशांतच्या संपत्तीचा वारस ठरला! वडिलांनी घेतला 'हा' मोठा निर्णय, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2020 11:26 AM2020-08-21T11:26:53+5:302020-08-21T11:37:07+5:30
सुशांतच्या संपत्तीचा वारस ठरला आहे. सुशांतचे वडील केके सिंह यांनी मोठा निर्णय घेतला आहे.
नवी दिल्ली - अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयला दिले आहेत. मुंबई पोलिसांनी सीबीआयला सहकार्य करावं, अशा सूचनादेखील न्यायालयाने केल्या आहेत. यानंतर आता सुशांतच्या संपत्तीचा वारस ठरला आहे. सुशांतचे वडील केके सिंह यांनी मोठा निर्णय घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर के. के. सिंह यांनी एक विधान केलं आहे.
सुशांतच्या वडिलांनी सुशांतच्या संपत्तीचा कायदेशीर वारस म्हणून स्वतःचं नाव दिलं आहे. के. के. सिंह यांनी ' मी सुशांतसिंह राजपूतच्या संपत्तीचा कायदेशीर वारस आहे. सुशांतने ज्या वकील, सीए आणि इतर कर्मचाऱ्यांना ठेवले होते आणि अन्य लोकंही जे त्याच्यासाठी काम करत होते ते आता सर्व संपलं आहे. आता त्यांना सुशांतबद्दल सांगण्याचा किंवा बोलण्याचा कोणताही अधिकार नाही' असं म्हटलं आहे.
'जर सुशांतसंदर्भात कोणाला काही बोलायचे असेल तर त्यांना आधी माझी परवानगी घ्यावी लागेल. सुशांतच्या कुटुंबात आता मी आणि त्याच्या बहिणींचा समावेश आहे. वरुणसिंह यांना आम्ही आमचा वकील म्हणून नेमले होते आणि त्यांच्यामार्फत ज्येष्ठ वकील विकास सिंह आमच्या कुटुंबाचे प्रतिनिधित्व करतील. जर दुसरं कोणी कुटुंबाचा सदस्य असल्याचा दावा करत असेल तर मी त्याची परवानगी देत नाही' असं देखील के. के. सिंह यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
Sushant Singh Rajput Death Case : रिया चक्रवर्तीवर बिहारचे डीजीपी संतापले, म्हणाले... https://t.co/kvu0j89zsc#SushantSingRajputDeathCase#SushantSingRajput#RheaChakraborthy#SupremeCourt#Bihar
— Lokmat (@MiLOKMAT) August 19, 2020
सुशांतच्या आत्महत्ये प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी हा अन्यायाविरुद्ध न्यायाचा विजय असल्याची प्रतिक्रिया दिली होती. तसेच रिया चक्रवर्तीवर देखील भाष्य केलं आहे. थेट रियाची 'औकात' काढली. बिहारच्या मुख्यमंत्र्यांबाबत बोलण्याची रिया चक्रवर्तीची 'औकात' नाही असं गुप्तेश्वर पांडे यांनी म्हटलं होतं. तसेच बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळेच हे यश मिळालं असल्याचं देखील त्यांनी सांगितलं. प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना त्यांनी असं म्हटलं होतं. यासोबतच न्यायालयाच्या निर्णयामुळे आपण प्रचंड आनंदी असल्याचं सांगत हा 130 कोटी जनतेच्या भावनांचा विजय असल्याचंही ते म्हणाले होते.
CoronaVirus News : लस तयार झाल्यानंतर सुरुवातीला ती 'या' लोकांना दिली जाणार?https://t.co/ig50fYOWZi#coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#COVID19India#coronainindia#CoronavirusVaccine
— Lokmat (@MiLOKMAT) August 21, 2020
महत्त्वाच्या बातम्या
तेलंगणातील हायड्रो प्रोजेक्टमध्ये भीषण आग, 9 जण अडकल्याची भीती
"येत्या 6-7 महिन्यांत देश तरुणांना रोजगार देऊ शकणार नाही", राहुल गांधींचा हल्लाबोल
"4 महिन्यांत गेल्या 2 कोटी लोकांच्या नोकऱ्या, 2 कोटी कुटुंबांचं भविष्य अंधारात"
धक्कादायक! पंतप्रधान मोदींना 18 पानांचं पत्र लिहून मुलीची आत्महत्या
VIDEO: ...अन् बिहारच्या डीजीपींनी थेट रिया चक्रवर्तीची 'औकात' काढली; ऐका काय म्हणाले
बापरे! आग्र्यामध्ये प्रवाशांनी भरलेली बस हायजॅक, परिसरात खळबळ