सुशांत आत्महत्याप्रकरण बिहार निवडणुकीचा मुद्दा नाहीच, पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2020 08:52 PM2020-09-15T20:52:09+5:302020-09-15T20:53:20+5:30

राज्याचे विरोधी पक्षनेते आणि बिहार विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे प्रभारी असलेल्या देवेंद फडणवीसांचा बिहार दौरा जोरात सुरू आहे. बिहारमधील माध्यमांसमोर ते पक्षाची भूमिका प्रभावीपणे मांडताना दिसून येतात

Sushant suicide case is not an issue of Bihar elections, but ..., devendra fadanvis on sushant rajput | सुशांत आत्महत्याप्रकरण बिहार निवडणुकीचा मुद्दा नाहीच, पण...

सुशांत आत्महत्याप्रकरण बिहार निवडणुकीचा मुद्दा नाहीच, पण...

Next
ठळक मुद्देत्य लपविण्याचा प्रयत्न झाल्यामुळे जनभावना तयार झाली. त्यानंतर, हा तपास सीबीआयकडे देण्यात आला असून सत्य बाहेर येईपर्यंत आम्ही थांबणार नाही, असेही फडणवीस यांनी म्हटले.

मुंबई - अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरून आक्रमक झालेल्या अभिनेत्री कंगना राणौतचे ठाकरे सरकारवरील हल्ले सुरूच आहेत. तर, दुसरीकडे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असते, तर सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा व्यवस्थित झाला असता, असं कंगनानं ट्विटमध्ये म्हटलं आहे. सध्या बिहार निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस हे बिहार दौऱ्यावर असून पत्रकारांनी सुशांतच्या मुद्द्यावरुन राजकारण होत असल्याचा प्रश्न विचारला असता, सुशांत हा बिहार निवडणुकीचा मुद्दा नसल्याचे फडणवीस यांनी म्हटले. 

राज्याचे विरोधी पक्षनेते आणि बिहार विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे प्रभारी असलेल्या देवेंद फडणवीसांचा बिहार दौरा जोरात सुरू आहे. बिहारमधील माध्यमांसमोर ते पक्षाची भूमिका प्रभावीपणे मांडताना दिसून येतात. बिहारमध्ये अॅन्टीइन्कबन्सी असल्याच्या प्रश्नावर बोलताना, कुठेही अॅन्टीइन्कम्बन्सी नसल्याचं ते म्हणाले. तसेच, बिहार विधानसभा निवडणुकीत सुशांत आत्महत्येप्रकरणाचं भाडवल केलं जात असल्याच्या प्रश्नावर उत्तर देताना, सुशांत हा राजकारणाचा मुद्दा नसल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलं. आम्ही सुशांतसिंह राजपूतच्या नावाने मत मागत नसून तो राजकारणाचा मुद्दा नाहीच. मात्र, ज्याप्रकारे त्यांचा मृत्यू झाला, त्यावरुन सर्वांनाच वाटते की, सत्य बाहेर आले पाहिजे. त्यामुळे, सत्य लपविण्याचा प्रयत्न झाल्यामुळे जनभावना तयार झाली. त्यानंतर, हा तपास सीबीआयकडे देण्यात आला असून सत्य बाहेर येईपर्यंत आम्ही थांबणार नाही, असेही फडणवीस यांनी म्हटले.   

कंगनाकडून फडणवीसांचे कौतुक

'माफियांचे लाड करणारी भ्रष्ट सोनिया सेना सत्तेत नसती, त्याजागी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असते, तर मुंबई पोलिसांना त्यांचं काम योग्यपणे करता आलं असतं, असं मी ठामपणे म्हणू शकते. फडणवीस मुख्यमंत्री असते, तर माध्यमांना आणि जनतेला न्याय मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला नसता,' अशा शब्दांत कंगनानं ठाकरे सरकारला लक्ष्य केलं. तसेच, देवेंद्र फडणवीस यांचं पहिल्यांदाच जाहीरपणे कौतुकही केलंय.

नरेंद्र मोदीच स्टार प्रचारक

बिहार निवडणुकीत कंगना राणौत भाजपासाठी स्टार प्रचारक म्हणून काम करणार अशी चर्चा सुरु आहे. यावर विरोधी पक्षनेते आणि बिहार भाजपाचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, एनडीएकडे सर्वात मोठे स्टार प्रचारक नरेंद्र मोदी आहेत. त्यामुळे आम्हाला कोणत्या दुसऱ्या स्टार प्रचारकाची आवश्यकता नाही. कंगना राणौत वारंवार तिच्या राजकीय भूमिकेबद्दल सांगण्यास टाळत आलेली आहे. रविवारी कंगना मुंबईत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना भेटण्यासाठी राज्यपाल भवनात गेली. त्यानंतर ज्यावेळी ती बाहेर आली तेव्हा तिच्या हातात कमळाचं फूल होतं.

उत्तर प्रदेशमध्ये जय जिजाऊ जय शिवराय

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी आग्र्यातील निर्माणाधीन मुघल संग्रहालयाचे (Agra Mughal Museum) नाव बदलण्याची घोषणा केली. हे संग्रहालय आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ओळखले जाईल, असं ते म्हणाले. हे संग्रहालय ताजमहालच्या पूर्वेकडील प्रवेशद्वाराजवळ उभारले जात आहे. योगी सरकारच्या या निर्णयावर महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एक खास ट्विट केलं आहे. जय जिजाऊ, जय शिवराय! म्हणत योगी सरकारच्या निर्णयाची स्तुती केली आहे. 

Web Title: Sushant suicide case is not an issue of Bihar elections, but ..., devendra fadanvis on sushant rajput

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.