नितीश कुमारांच्या NDA प्रवेशाला सुशील मोदींनी सिग्नल दिला; भाजपची रणनीतीही सांगितली
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2024 04:02 PM2024-01-25T16:02:21+5:302024-01-25T16:04:18+5:30
देशात काही दिवसातच लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत.
Political News ( Marathi News ) : देशात काही दिवसातच लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. सर्व पक्षांनी या निवडणुकांची तयारी केली असून विरोधकांच्या इंडिया आघाडीत जागावाटपाचीही चर्चा सुरू आहे. पण बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार गेल्या काही दिवसापासून इंडिया आघाडीपासून अंतर ठेवून आहेत, आता नितीश कुमार एनडीए सोबत जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहे. दरम्यान, आता भाजप खासदार सुशील कुमार मोदी यांच्या विधानाने पुन्हा राजकीय वर्तुळात या चर्चा सुरू आहेत.
खासदार सुशील कुमार मोदी म्हणाले, जर केंद्रीय नेतृत्वाला नितीश कुमार यांनी एनडीएमध्ये प्रवेश करावा असं वाटत असेल तर राज्य युनिट हा निर्णय मान्य करेल. यासोबतच सुशील मोदींनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेपोटिझमबाबत केलेल्या वक्तव्याचे कौतुक केले आहे.
अयोध्येत दुमदुमला महाराष्ट्राचा आवाज...; पाहा, ढोल-ताशांचा हा मंत्रमुग्ध करणारा व्हिडीओ!
सुशील कुमार मोदी म्हणाले की, नितीश कुमार यांनी पहिल्यांदाच कुटुंबवादावर योग्य बोलले आहेत. परिवारवादाला विरोध हे भाजपचे धोरण आहे आणि मुख्यमंत्री नितीश कुमारही त्याच विचारसरणीचे आहेत. कर्पुरी जयंतीच्या रॅलीत आपल्या भाषणात मुख्यमंत्री नितीश यांनी परिवारवादावर निशाणा साधला होता. यामुळे अप्रत्यक्षपणे लालू कुटुंब आणि राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. हे भाजपचे धोरण आहे आणि पंतप्रधान मोदी हे त्याचे सर्वात मोठे विरोधक आहेत, असंही सुशील मोदी म्हणाले.
सुशील मोदी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानणे त्यांची राजकीय नैतिकता दर्शवते. हे आभार मानायला हवे होते आणि राजकारणात हे व्हायला हवे होते.
लोकसभा निवडणुकीपूर्वी राजकारणात मोठी घडामोड
याआधी केंद्रीय मंत्री पशुपती कुमार पारस यांनीही मोठं वक्तव्य केलं होतं आणि बिहारमध्ये ३१ जानेवारीपर्यंत काहीतरी मोठं घडू शकतं. त्यांचा संदर्भ आघाडीतील सत्ताबदलाकडे होता. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, बिहारमध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली की नितीश कुमार यांना एनडीएचा भाग व्हायचे असेल तर एनडीए आघाडीतील मित्रपक्षांचा त्याला आक्षेप नाही.यामुळे आता लोकसभा निवडणुकीपूर्वी बिहारच्या राजकारणात मोठी घडामोड घडणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.