सुशील करंडक गोज टू ‘ग्रॅज्युएट’ सुशील करंडक निकाल : औरंगाबादचे ‘पाझर’ द्वितीय तर सोलापूरचे ‘मे आय हेल्प यू’ तृतीय

By admin | Published: February 29, 2016 12:07 AM2016-02-29T00:07:33+5:302016-02-29T00:07:33+5:30

सोलापूर:

Sushil Trophy Goes to 'Graduate' Sushil Trophy Results: 'Pazhar' second in Aurangabad and 'May I Help You' in Solapur | सुशील करंडक गोज टू ‘ग्रॅज्युएट’ सुशील करंडक निकाल : औरंगाबादचे ‘पाझर’ द्वितीय तर सोलापूरचे ‘मे आय हेल्प यू’ तृतीय

सुशील करंडक गोज टू ‘ग्रॅज्युएट’ सुशील करंडक निकाल : औरंगाबादचे ‘पाझर’ द्वितीय तर सोलापूरचे ‘मे आय हेल्प यू’ तृतीय

Next
लापूर:
प्रचंड उत्सुकता़़़टाळ्या अन् शि?य़ा़़़गणपती बाप्पा मोरयाच्या घोषणा़़़तृतीय क्रमांक झाला़़़़द्वितीय जाहीर झाला अन् आता जिंकणार कोण? याची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असतानाच निकाल जाहीर झाला़़़ सुशील करंडक गोज टू ‘ग्रॅज्युएट’.़टाळ्यांच्या कडकडाटात पुरस्काराचा सोहळा अधिकच रंगला़
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या सोलापूर शाखेच्या वतीने घेण्यात आलेल्या सुशील करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचा निकाल रविवारी सायंकाळी हिराचंद नेमचंद सभागृहात जाहीर करण्यात आला़ तीन दिवसांत हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या रंगमंचावर 23 एकांकिका सादर झाल्या़ राजाराम बापू अभियांत्रिकी महाविद्यालय, इस्लामपूरच्या ग्रॅज्युएट या एकांकिकेस प्रथम पुरस्कार जाहीर झाला; मात्र त्यांची टीम उपस्थित नव्हती़ औरंगाबादच्या नाट्यवाडा संस्थेचे ‘पाझर’ या एकांकिकेस द्वितीय तर सोलापूरच्या मल्हार अकॅडमीच्या ‘मे आय हेल्प यू’ या एकांकिकेस तृतीय क्रमांक जाहीर झाल्यावर घोषणा आणि जल्लोषात आनंदोत्सव साजरा करण्यात आला़
विजेत्यांना सिनेनाट्य अभिनेते प्रदीप कबरे, आ़ प्रणिती शिंदे, महापौर सुशीला आबुटे, अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद सोलापूर शाखेचे अध्यक्ष प्रकाश यलगुलवार, प्रमुख कार्यवाह विष्णू संगमवार, विठ्ठल बडगंची, परिक्षक रश्मी देव, मोहन फुले यांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आल़े प्रारंभी प्रकाश यलगुलवार यांनी प्रास्ताविक करुन सुशील करंडकची भूमिका विशद केली़ यावेळी आ़ प्रणिती शिंदे, प्रदीप कबरे यांनी मनोगत व्यक्त केल़े कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास मार्डीकर यांनी केले तर विठ्ठल बडगंची यांनी आभार मानल़े या स्पर्धेसाठी प्रा़ ज्योतीबा काटे, मनोज यलगुलवार, शशीभूषण यलगुलवार आदींनी पर्शिम घेतल़े


इन्फो बॉक्स़़़
स्पर्धेचा निकाल कंसात एकांकिकेचे नाव
-उत्कृष्ट दिग्दर्शन: प्रथम प्रवीण पाटेकर (पाझर), द्वितीय- वैभव चव्हाण, सौरभ एडगे (ग्रॅज्युएट), तृतीय- राजशेखर वाघमारे (मे आय हेल्प यू)़
-उत्कृष्ट अभिनय पुरुष: प्रथम शिवराज नाळे (ग्रॅज्युएट), द्वितीय-कुबेर शास्त्री (मे आय हेल्प यू), तृतीय- प्रणव जोशी (लेखकाचा कुत्रा)
-उत्कृष्ट अभिनय स्त्री: प्रथम-आकांक्षा बिराजदार (जस्ट लाईक दॅट), द्वितीय- ममता बोल्ली (जर्नी बिटवीन दी लाईन), तृतीय- पूनम चव्हाण (शेवटचे हिरवे पान)
-उत्कृष्ट नेपथ्य: प्रथम- प्रसाद गोरे (ग्रॅज्युएट), द्वितीय- विकास वाघमारे (मे आय हेल्प यू), तृतीय- एस़आऱडी़ टीम (शेवटचे हिरवे पान)
-उत्कृष्ट प्रकाशयोजना: प्रथम- सौरभ एडगे, सौरभ कुलकर्णी (ग्रॅज्युएट), द्वितीय- चेतन ढवळे (पाझर), तृतीय- गणेश मरोड ( मे आय हेल्प यू)
-उत्कृष्ट पार्श्वसंगीत: प्रथम- कुणाल यंगल, वैभव निकते (स्पॉट), द्वितीय- किरण जोशी (मे आय हेल्प यू), तृतीय-चैतन्य दुबे (जस्ट लाईक दॅट)
-स्पर्धेसाठी लिहिलेल्या एकांकिका: प्रथम-स्पॉट अमीर तडवळकर, द्वितीय- स्वरदा बुरसे (जस्ट लाईक दॅट), तृतीय-तालीब सोलापुरी (घुसमट)
-उत्कृष्ट बालकलावंत- प्रथम- तन्नया जाधव (उठसूठ भावना फूट), द्वितीय- रोहन पेठकर (संभ्रम)़


कोट़़़़
रंगभूमीची मजा काय औरच असत़े त्यामुळे सोलापूरच्या कलाकारांनी आता व्यावसायिक रंगभूमीवर याव़े नाटकांना शासनाकडून देखील अनुदान मिळत़े सोलापूरची रंगभूमी मी आयुष्यभर विसरु शकणार नाही़ सुशील करंडक एकांकिका स्पर्धा ही कौतुकास्पद आह़े
प्रदीप कबरे
सिनेनाट्य अभिनेते

Web Title: Sushil Trophy Goes to 'Graduate' Sushil Trophy Results: 'Pazhar' second in Aurangabad and 'May I Help You' in Solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.