सुशीलकुमार शिंदे हिमाचलसाठी निरीक्षक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 03:55 AM2017-12-30T03:55:03+5:302017-12-30T03:55:16+5:30
नवी दिल्ली : अलीकडेच निवडणुका झालेल्या गुजरात व हिमाचल प्रदेश या दोन राज्यांच्या नवनिर्वाचित विधानसभांमधील काँग्रेस विधिमंडळ पक्षांचे नेते निवडण्यासाठी होणा-या बैठकींसाठी काँग्रेस पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी अनुक्रमे अशोक गेहलोत व सुशीलकुमार शिंदे या दोन सरचिटणीसांची नेमणूक केली आहे.
नवी दिल्ली : अलीकडेच निवडणुका झालेल्या गुजरात व हिमाचल प्रदेश या दोन राज्यांच्या नवनिर्वाचित विधानसभांमधील काँग्रेस विधिमंडळ पक्षांचे नेते निवडण्यासाठी होणा-या बैठकींसाठी काँग्रेस पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी अनुक्रमे अशोक गेहलोत व सुशीलकुमार शिंदे या दोन सरचिटणीसांची नेमणूक केली आहे. पक्षाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनानुसार या बैठकींच्या वेळी गुजरातमध्ये माजी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग हे गेहलोत यांना तर हिमाचल प्रदेशमध्ये महाराष्ट्राचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात शिंदे यांना मदत करतील.
मेघालय विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी समन्वयक म्हणून महाराष्ट्रातील काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांना नेमण्यात आल्याचेही पक्षाने कळविले आहे.