Sushma Swaraj Death: जॉर्ज फर्नांडिस यांचा बेड्या घातलेला फोटो घेऊन केला होता प्रचार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2019 03:58 AM2019-08-07T03:58:17+5:302019-08-07T03:58:30+5:30
देशात आणीबाणी लागू केली असतानाच्या काळात समाजवादी नेते जॉर्ज फर्नांडिस यांच्यावर डायनामाईटची केस लावण्यात आली होती.
देशात आणीबाणी लागू केली असतानाच्या काळात समाजवादी नेते जॉर्ज फर्नांडिस यांच्यावर डायनामाईटची केस लावण्यात आली होती. फर्नांडिस तुरुंगात होते. त्यांनी अटकेत असतानाच मुझफ्फरपूरमधून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी फर्नांडिस यांचा हातात बेड्या घातलेला फोटो घेऊन सुषमा स्वराज यांनी संपूर्ण मतदारसंघात प्रचार केला होता. या निकालाचे परिणाम आले तेव्हाही फर्नांडिस तुरुंगातच बंद होते.
राजकीय तज्ज्ञ सांगतात की, २०१३ साली नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनण्यापासून रोखण्यासाठी लालकृष्ण अडवाणी यांनी सुरू केलेल्या मोहिमेत सुषमा स्वराजही त्यांच्यासोबत होत्या. या मोहिमेत अखेरपर्यंत स्वराज यांनी अडवाणींना साथ दिली. याची खूप मोठी किंमत सुषमा स्वराज यांना भविष्यात मोजावी लागेल, असे त्यावेळी जाणकारांना वाटत होते.
इंदिरा गांधी यांच्यानंतर सुषमा स्वराज या परराष्ट्रमंत्रीपद सांभाळणाऱ्या दुस-या महिला होत्या. परराष्ट्रमंत्रीपदावर असताना सुषमा स्वराज ट्विटवर खूप सक्रिय होत्या. नागरिकांच्या पासपोर्टबाबत काही तक्रारी असोत किंवा परदेशात अडकलेल्या नागरिकांना मदत करणे असो त्या नेहमी पुढाकार घेत असत. लहान-सहान गोष्टींसाठी थेट त्यांची मदत मागणाऱ्यांना त्यांनी विनोदबुद्धीने सुनावलेही आहे.