Sushma Swaraj Death: राजकारणातला तेजस्वी अध्याय समाप्त- नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2019 12:18 AM2019-08-07T00:18:54+5:302019-08-07T07:17:04+5:30

माजी परराष्ट्र मंत्री आणि भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचं निधन झालं.

Sushma Swaraj Death: sushma swarajji demise is a personal loss tweeted by pm narendra modi | Sushma Swaraj Death: राजकारणातला तेजस्वी अध्याय समाप्त- नरेंद्र मोदी

Sushma Swaraj Death: राजकारणातला तेजस्वी अध्याय समाप्त- नरेंद्र मोदी

Next

नवी दिल्लीः माजी परराष्ट्र मंत्री आणि भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचं निधन झालं. त्यांच्या निधनानं राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर अनेक राजकीय नेत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही राजकारणातील तेजस्वी अध्याय समाप्त झाल्याची भावना व्यक्त केली आहे.

जनतेच्या सेवेसाठी आणि गोरगरिबांच्या कल्याणासाठी आपले जीवन अर्पण करणाऱ्या एका उल्लेखनीय नेत्याच्या निधनाबद्दल भारत दु: खी आहे. कोट्यवधी लोकांना प्रेरणा देणारं व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेलं. सुषमा स्वराज या जबरदस्त वक्त्या होत्या आणि उत्कृष्ट खासदार होत्या. पक्षाच्या पातळीवर त्यांचा नेहमीच आदर आणि सत्कार केला आहे.

भाजपा वाढवण्यात त्यांचा मोठा सहभाग होता. त्या कुशल प्रशासक होत्या. त्यांनी जी मंत्रालयं सांभाळली तिथे उच्च प्रतीचं काम केलं. इतर देशांशी द्विपक्षीय संबंध वाढवण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. तसेच परदेशात अडकून पडलेल्या भारतीयांना त्यांनी वेळोवेळी मदतीचा हात दिला. सुषमाजींच्या जाण्यानं मोठं नुकसान झालं आहे. त्यांनी देशासाठी जे केलं ते नेहमीच लक्षात राहील. दुःखाच्या या क्षणात मी त्यांच्या कुटुंबीयांबरोबर आहे. गेल्या पाच वर्षांपासून त्या परराष्ट्र मंत्रालयात ज्या पद्धतीनं काम करत होत्या ते उल्लेखनीय होतं. त्यांची तब्येत ठीक नसतानाही त्या कामाला न्याय देण्याचा प्रयत्न करायच्या. त्यांचा उत्साह आणि कामाप्रति बांधिलकी अद्वितीय होती. दुःखाच्या या क्षणात मी त्यांच्या कुटुंबीयांबरोबर आहे. सुषमा स्वराज यांच्या निधनाने एका अभ्यासू आक्रमक पर्वाचा अंत झाला आहे. हरियाणात वयाच्या २५ व्या वर्षी कॅबिनेटमंत्रीपद, २७ व्या वर्षी पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रात परराष्ट्र खात्यासह महत्वाच्या पदाचे यशस्वी काम पाहणाऱ्या सुषमा स्वराज यांनी राजकारणात खूप कमी वयात आपले वेगळे अस्तित्व निर्माण केले. सुषमा स्वराज नेहमीच म्हणायच्या की, राजकारण हे करियर म्हणून नव्हे, तर मिशन म्हणून आपण स्वीकारले आहे. घर आणि राजकारण यात कुणालाही प्राधान्य देण्याऐवजी मी यात संतुलन साधले आहे.  

Web Title: Sushma Swaraj Death: sushma swarajji demise is a personal loss tweeted by pm narendra modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.