Sushma Swaraj Death : देशाने लाडकी लेक गमावली - राष्ट्रपती
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2019 11:28 AM2019-08-07T11:28:34+5:302019-08-07T11:53:55+5:30
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सुषमा स्वराज यांच्या निधनानंतर दु:ख व्यक्त केलं आहे. तसेच देशाने लाडकी लेक गमावली असं राष्ट्रपतींनी म्हटलं आहे.
नवी दिल्ली - भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज (67) यांचे मंगळवारी रात्री हृदयविकाराने निधन झालं आहे. सुषमा स्वराज यांना रात्री 9 च्या सुमारास एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. भाजपाच्या धडाडीच्या नेत्या म्हणून सुषमा स्वराज यांची वेगळी ओळख होती. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सुषमा स्वराज यांच्या निधनानंतर दु:ख व्यक्त केलं आहे. तसेच देशाने लाडकी लेक गमावली असं राष्ट्रपतींनी म्हटलं आहे.
'सुषमा स्वराज यांच्या निधनाने प्रचंड दु:ख झालं आहे. देशाने आपली लाडकी लेक गमावली आहे. सुषमा स्वराज धाडस आणि निष्ठेचं मूर्तीमंत उदाहरण होत्या. लोकांच्या मदतीसाठी त्या नेहमीच तत्पर असायच्या. त्यांची सेवा आणि योगदान देश विसरणार नाही' असं ट्वीट रामनाथ कोविंद यांनी केलं आहे.
श्रीमती सुषमा स्वराज के निधन से बहुत दुःख हुआ है। देश ने अपनी एक अत्यंत प्रिय बेटी खोई है। सुषमा जी सार्वजनिक जीवन में गरिमा, साहस और निष्ठा की प्रतिमूर्ति थीं। लोगों की सहायता के लिए वे हमेशा तत्पर रहती थीं। उनकी सेवाओं के लिए सभी भारतीय उन्हें सदैव याद रखेंगे—राष्ट्रपति कोविन्द
— President of India (@rashtrapatibhvn) August 6, 2019
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सुषमा स्वराज यांना आदरांजली वाहिली आहे. 'सुषमा स्वराज यांच्या निधनाने भाजपा आणि भारतीय राजकारणाची अपरिमीत हानी झाली आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो' असं अमित शहा यांनी म्हटलं आहे.
पूर्व विदेश मंत्री और भाजपा की वरिष्ठ नेता व संसदीय बोर्ड की सदस्य श्रीमती सुषमा स्वराज जी के आकस्मिक निधन से मन अत्यंत दुखी है।
— Amit Shah (@AmitShah) August 6, 2019
उन्होंने एक प्रखर वक्ता, एक आदर्श कार्यकर्ता, लोकप्रिय जनप्रतिनिधि व एक कर्मठ मंत्री जैसे विभिन्न रूपों में भारतीय राजनीति में अपनी अमिट छाप छोड़ी है।
सुषमा स्वराज यांचं असं अचानक जाणं देशवासीयांना चटका लावून जाणारं आहे. अर्थात, राजकीय कारकिर्दीत त्यांनी केलेली कामगिरी, धडाकेबाज पराक्रम आणि अनेक विक्रम त्यांची कायमच आठवण करून देणारे आहेत.
Sushma Swaraj: सुषमा स्वराज यांचं शेवटचं ट्विट राष्ट्रप्रेमाने ओतप्रोत भरलेलं; वाचून कराल सलाम! https://t.co/wa0vYNPtHf#SushmaSwaraj
— Lokmat (@MiLOKMAT) August 6, 2019
काश्मीरबाबत केंद्र सरकारनं घेतलेल्या निर्णयानंतर सुषमा स्वराज यांनी मंगळवारीच ट्विट केले होते की, पंतप्रधानजी, आपले हार्दिक अभिनंदन. मी माझ्या आयुष्यात हाच दिवस पाहण्याची प्रतीक्षा करीत होते. विशेष म्हणजे, या ट्विटनंतर काही तासांतच म्हणजेच रात्री साडेनऊ वाजता हृदयविकारामुळे सुषमा स्वराज यांना एम्समध्ये दाखल करण्यात आलं. त्यांना लगेच अतिदक्षता विभागात हलवण्यात आले. त्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, हर्ष वर्धन आणि भाजपच्या अन्य ज्येष्ठ नेत्यांनी एम्समध्ये धाव घेतली. रात्री उशिरा एम्सने सुषमा स्वराज यांचं निधन झाल्याची माहिती दिली.
तुम्ही मंगळ ग्रहावर जरी असाल तरी मदत करु: सुषमा स्वराज https://t.co/lHaqGOerfP
— Lokmat (@MiLOKMAT) August 7, 2019
सुषमा स्वराज यांचा जन्म 14 फेब्रुवारी 1952 रोजी हरयाणाच्या अंबालामध्ये (तेव्हाचे पंजाब) झाला. अंबालाच्या महाविद्यालयातून त्यांनी संस्कृत आणि राज्यशास्त्रात पदवी मिळविली होती. त्यानंतर त्यांनी पंजाब विद्यापीठातून कायद्याची पदवी मिळविली. 1973 मध्ये त्यांनी सर्वोच्च न्यायालयात वकिली सुरूकेली. 1975 मध्ये त्यांचा विवाह स्वराज कौशल यांच्याशी झाला. बांसुरी ही त्यांची मुलगी. लंडनमध्ये ती वकिली करते.
इस दिन को देख लिया आप ने लेकिन आपको हम फिर कभी ना देख पाएँगे RIP Mother India...You carry with you the affection of over a billion people. https://t.co/xyJjEBzcJA
— anand mahindra (@anandmahindra) August 6, 2019
सुषमा स्वराज यांच्या राजकीय कारकिर्दीत 1999मध्ये मोठी उलथापालथ झाली. त्यांना काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधींविरोधात कर्नाटकातल्या बेल्लारीतून निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं. भाजपानं जाणूनबुजून सोनिया गांधींविरोधात त्यांना उभं केलं होतं. त्याच्यामागेही एक कारण होतं. भाजपानं परदेशी सून आणि भारताची मुलगी अशी प्रचाराची रणनिती आखली होती. पण निवडणुकीत सुषमा स्वराज यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. भाजपाची ती रणनिती बेल्लारीच्या लोकांवर फार प्रभाव पाडू शकली नाही.
प्रत्येकाशी जुळवून घेण्याची स्वराज यांची वृत्ती कायम लक्षात राहील - राज ठाकरे @mnsadhikrut@RajThackeray#SushmaSwarajhttps://t.co/CCOAvq93wn
— Lokmat (@MiLOKMAT) August 7, 2019
नेतृत्व क्षमतेच्या जोरावर सुषमा स्वराज यांच्याकडे भाजपाच्या दुसऱ्या पिढीतील सर्वात वजनदार नेत्या म्हणून पाहिलं जात होतं. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी विदिशातून विजय मिळवला होता. त्यांची पत आणि भाजपासाठी दिलेलं योगदान लक्षात घेता मोदींनी त्यांच्याकडे परराष्ट्र मंत्रालयासारखं महत्त्वाचं खातं सोपवलं. इंदिरा गांधींनंतर सुषमा स्वराज या दुसऱ्या महिला परराष्ट्र मंत्री झाल्या. त्यांनी परराष्ट्र मंत्रालयातही आपला वेगळा ठसा उमटवला.
Sushma Swaraj Death : तेजस्वी युगाचा अंत झाला, उद्धव ठाकरेंकडून सुषमा स्वराज यांना आदरांजली https://t.co/yYMyuySdrE#SushmaSwaraj
— Lokmat (@MiLOKMAT) August 7, 2019
NCC कॅडेट ते परराष्ट्र मंत्री...सुषमा स्वराज यांची 'फोटोबायोग्राफी' #SushmaSwarajhttps://t.co/SxAr3tTk8v
— Lokmat (@MiLOKMAT) August 7, 2019