सक्तीच्या धर्मांतराचा विषय पाककडे उपस्थित करणार : सुषमा स्वराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 01:01 AM2017-12-20T01:01:59+5:302017-12-20T01:02:13+5:30
खैबर-पख्तुनख्वॉमध्ये (के-पी) सरकारी अधिकाºयांनी शिखांचे जबरदस्तीने इस्लाममध्ये धर्मांतर करून घेतले जात असल्याचा विषय भारत पाकिस्तान सरकारच्या उच्च पातळीवर उपस्थित करेल, असे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी मंगळवारी सांगितले.
नवी दिल्ली : खैबर-पख्तुनख्वॉमध्ये (के-पी) सरकारी अधिकाºयांनी शिखांचे जबरदस्तीने इस्लाममध्ये धर्मांतर करून घेतले जात असल्याचा विषय भारत पाकिस्तान सरकारच्या उच्च पातळीवर उपस्थित करेल, असे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी मंगळवारी सांगितले.
पाकमधील आघाडीचे दैनिक ‘द एक्स्प्रेस ट्रिब्यून’मध्ये सक्तीच्या धर्मांतराचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. के-पीतील हांगू जिल्ह्यात अधिकारी जबरदस्तीने इस्लाम धर्म स्वीकारायला भाग पाडत असल्याची तक्रार शीख समाजाची असल्याचे वृत्तात म्हटले होते. प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार शीख समाजाने उपायुक्त शाहीद मेहमूद यांच्याकडे तक्रार दिली आहे. त्यात असा दावा करण्यात आला आहे की, याल तहसीलचे सहायक आयुक्त याकूब खान हे शिखांना इस्लाम धर्म स्वीकारायची सक्ती करीत आहेत.