परराष्ट्र विभागावर सुषमा स्वराज यांची अमीट छाप
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2019 04:15 AM2019-06-03T04:15:31+5:302019-06-03T04:15:42+5:30
वुई मिस यू : थायलंड, इस्रायलच्या राजदूतांचे ट्विट
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या पर्वात सुषमा स्वराज यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाला नसला तरी परराष्ट्र विभागावर त्यांचीच अमीट छाप आहे. सोशल मीडियावर अनेक देशांचे राजदूत, पररराष्ट्र धोरणाचे अभ्यासक व राजकीय नेत्यांनादेखील याच मनस्वी भावनांना वाट करून दिली. परराष्ट्र मंत्री म्हणून केलेल्या कामगिरीचे अनेकांनी कौतुक केले.
थायलंडचे भारतातील राजदूत सॅम यांनी ट्विटरवर सुषमा स्वराज यांचे आभार मानले. थायलंड देश व मी तुम्हाला कधीही विसरणार नाही, अशा शब्दात राजदूत सॅम यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. चीनमध्ये अनेक वर्ष पत्रकार म्हणून काम केलेल्या अनंत कृष्णन म्हणाले की, परराष्ट्र व्यवहार मंत्र्याची अगदी स्थानिक स्तरावर दखल घेण्याची सवय स्वराज यांनी लावली. हीच नवी परंपरा त्यांनी निर्माण केली. गेल्या पाच वर्षात त्यांनी परराष्ट्र विभागाला नवा चेहरा दिला. सहज एकहाती संपर्क करून त्यांनी परदेशातील दूतावासांना अजून जबाबदार बनवले.
इस्रायलचे भारतातील माजी राजदूत डॅनिअल कॅमरून यांनी ‘तुमच्याच कारकिर्दीत मी राजदूत होतो’ अशी आठवण करून दिली. दोन्ही देशांमधील संबंध घनिष्ठ होताना मला साक्षीदार होता आले. तुमच्या इस्त्रायल भेटीदरम्यानचा माझा अनुभव विलक्षण होता, असे कॅमरून म्हणाले. मालदीवच्या परराष्ट्र मंत्री अब्दुल्ला शाहिद यांनीदेखील स्वराज यांच्या कामगिरीचे कौतुक केले. परराष्ट्र मंत्रिदावर दैदप्यिमान परंपरेची छाप स्वराज यांनी सोडल्याचे नमूद करून ते म्हणाले, मालदीवसाठी तुम्ही सच्च्या मित्रत्त्वाची भूमिका निभावली. भारतीयांसाठी तुमची कार्यकुशलता, कार्यभावना माझ्यासह अनेकांना प्रेरणादायी आहे.
कामाला ‘पर्सनल टच’ देणाऱ्या स्वराज
काँग्रेस खासदार शशी थरूर यांनीदेखील स्वराज यांचे कौतुक केले आहे. नवे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचे अभिनंदन करताना थरूर म्हणाले, सुषमा स्वराज यांच्यासमवेत काम करता आले. जयशंकर उत्तम काम करतीलच परंतु कोणत्याही कामाला ‘पर्सनल टच’ देणाºया स्वराज यांना आम्ही कधीही विसरणार नाही.