सुषमा स्वराज यांची मूत्रपिंडे निकामी
By admin | Published: November 17, 2016 02:32 AM2016-11-17T02:32:27+5:302016-11-17T02:32:27+5:30
परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांची मूत्रपिंडे निकामी झाल्याने, त्यांच्यावर येथील एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नवी दिल्ली : परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांची मूत्रपिंडे निकामी झाल्याने, त्यांच्यावर येथील एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुषमा स्वराज यांनीच टिष्ट्वटरवरून ही माहिती दिली आहे.
सुषमा स्वराज यांनी टिष्ट्वट केले आहे की, ‘मूत्रपिंडे निकामी झाल्याने मी सध्या एम्समध्ये आहे. सध्या डायलिसिस सुरू आहे. प्रत्यारोपणासाठी सध्या काही चाचण्या केल्या जात आहेत. भगवान कृष्ण आशीर्वाद देईल.’
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात त्या सहभागी होऊ शकणार नाहीत, असे वाटत आहे. सुषमा स्वराज यांना श्वसनासंबंधी उपचारासाठी एप्रिलमध्ये एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. सुषमा स्वराज यांनी हे टिष्ट्वट केल्यानंतर नेते आणि समाजातील विविध क्षेत्रांतील नागरिकांनी त्यांना लवकर बरे वाटावे, अशा सदिच्छा व्यक्त केल्या. (वृत्तसंस्था)
अजून दाता मिळाला नाही
सुषमा स्वराज यांच्यावर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यासाठी अद्याप मूत्रपिंडदाता मिळाला नसल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रक्रियेसाठी वेळ लागेल, असे डॉक्टरांनी सांगितले. नेफ्रोलॉजीस्ट डॉ. संदीप महाजन यांच्यासह निखिल टंडन, डॉ. रणदीप गुलेरिया आणि बलराम एरन हे डॉक्टर सध्या उपचार करीत आहेत.