सुषमा स्वराज यांची किडनी फेल, 'एम्स'मध्ये उपचार सुरू

By admin | Published: November 16, 2016 10:17 AM2016-11-16T10:17:32+5:302016-11-16T11:59:37+5:30

परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची किडनी फेल झाली असून त्यांच्यावर सध्या दिल्लीतील 'एम्स' रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Sushma Swaraj's kidney failure, 'AIIMS' treatment continues | सुषमा स्वराज यांची किडनी फेल, 'एम्स'मध्ये उपचार सुरू

सुषमा स्वराज यांची किडनी फेल, 'एम्स'मध्ये उपचार सुरू

Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १६ - परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची किडनी फेल झाली असून त्यांच्यावर सध्या दिल्लीतील 'एम्स' रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  गेल्या काही दिवसांपासून स्वराज या सार्वजनिक जीवनात फारशा सक्रिय दिसत नव्हत्या. विशेष म्हणजे, आजपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होणार असून, त्यावेळी परराष्ट्र मंत्र्यांबाबत प्रश्न विचारले जातील, हे लक्षात घेऊनच खुद्द स्वराज यांनी ट्विटरवरून आपल्या प्रकृतीची माहिती दिली.
' किडनी फेल झाल्यामुळे मी एम्स रुग्णालयात मी डायलिसीसवर आहे. किडनी प्रत्यारोपणासाठी माझ्यावर सध्या विविध चाचण्या सुरु आहेत' असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केले आहे. 
स्वराज यांची प्रकृती गेल्या काही महिन्यांपासून ठीक नव्हती. काही दिवसांपूर्वी संयुक्त राष्ट्रांच्या सभेत जोरदार भाषण केले. ती एक सभा सोडल्यास त्या सार्वजनिक जीवनात फारशा सक्रिय दिसल्या नाहीत. काही महिन्यांपूर्वीच त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते, तेव्हाच भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांनी त्यांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली होती.
मात्र आता त्यांच्या आजाराने पुन्हा उचल खाल्ली असून सध्या 'एम्स' रुग्णालयात किडनी प्रत्यारोपणासाठी त्यांच्या विविध चाचण्या करण्यात येत आहेत. 

Web Title: Sushma Swaraj's kidney failure, 'AIIMS' treatment continues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.