बनावट कागदपत्रांद्वारे प्लॉट खरेदी करणार्‍या संशयिताला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2016 11:34 PM2016-06-14T23:34:36+5:302016-06-14T23:34:36+5:30

जळगाव : बनावट कागदपत्रे तयार करून प्लॉट खरेदी करीत फसवणूक केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्‘ातील संशयित आरोपी अरमान चिंधा पटेल (वय ३४, रा.प्लॉट नंबर ४/बी, रजा कॉलनी, मेहरूण, जळगाव) याला पोलिसांनी १३ जूनला दुपारी ४.४३ वाजता अटक केली. त्याला मंगळवारी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यास १८ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

The suspect arrested by the fake documents was arrested | बनावट कागदपत्रांद्वारे प्लॉट खरेदी करणार्‍या संशयिताला अटक

बनावट कागदपत्रांद्वारे प्लॉट खरेदी करणार्‍या संशयिताला अटक

googlenewsNext
गाव : बनावट कागदपत्रे तयार करून प्लॉट खरेदी करीत फसवणूक केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्‘ातील संशयित आरोपी अरमान चिंधा पटेल (वय ३४, रा.प्लॉट नंबर ४/बी, रजा कॉलनी, मेहरूण, जळगाव) याला पोलिसांनी १३ जूनला दुपारी ४.४३ वाजता अटक केली. त्याला मंगळवारी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यास १८ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
गजानन कॉलनीतील रहिवासी संतोष मधुकर मुळे यांच्या आई सुमन मुळे यांच्या नावे मेहरूण शिवारात ३ हजार स्वेअर फुटाचा बखळ प्लॉट आहे. त्यांचे २२ एप्रिल २०१४ रोजी निधन झालेले आहे. असे असताना संशयित आरोपी अरमान पटेल, नीलेश सुभाष पाटील (रा.कुंभारसिम, ता.जामनेर), गफूर सिकंदर पटेल (रा.रजा कॉलनी, मेहरूण), मंगेश शांताराम पाटील (रा.कुंभारसिम, ता.जामनेर), सुरेश ओंकार माळी (रा.तांबापुरा, अमळनेर), किरण गणपत धनगर (रा.अमळनेर) व एक अनोळखी तोतया स्त्री यांनी फिर्यादी संतोष मुळे यांच्या मयत आईच्या जागी दुसरी अनोळखी स्त्री उभी केली. तसेच साक्षीदार व ओळखदार म्हणून ओळख देऊन बनावट दस्तावेजांआधारे खरेदी खताचा दस्त लिहून नोंदणी करीत फसवणूक केली. हा प्रकार समजल्यानंतर संतोष मुळे यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून वरील संशयित आरोपींविरुद्ध १६ मे रोजी भादंवि कलम ४२०, ४६६, ४६७, ४६८, ४७१, १९२, १९३, १९९, ४१६ प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. या गुन्‘ात प्रमुख सूत्रधार असलेल्या अरमान पटेल याला शहर पोलिसांनी १३ रोजी अटक केली. मंगळवारी त्याला न्यायाधीश प्रतिभा पाटील यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यास १८ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. सरकारतर्फे ॲड.राजेश गवई यांनी तर संशयित आरोपीतर्फे ॲड.मुकेश शिंपी यांनी कामकाज पाहिले.

Web Title: The suspect arrested by the fake documents was arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.