मोबाइल चोरल्याचा संशय; अल्पवयीन मुलाला विहिरीत लटकवले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2022 09:24 AM2022-10-19T09:24:46+5:302022-10-19T09:25:08+5:30
छतरपूर : मोबाइल चोरल्याच्या संशयावरून एका बालकाला २० फूट खोल विहिरीत लटकविण्यात आले. बालकाने विनवणी केली, दयेची भीक मागितली. ...
छतरपूर : मोबाइल चोरल्याच्या संशयावरून एका बालकाला २० फूट खोल विहिरीत लटकविण्यात आले. बालकाने विनवणी केली, दयेची भीक मागितली. मात्र, आरोपीच्या काळजाला पाझर फुटला नाही. एक हात पकडून त्याने पाच मिनिटे बालकाला विहिरीत लटकवून ठेवले. छतरपूर जिल्ह्यातील अक्टौहा येथे रविवारी ही खळबळजनक घटना घडली. कहर म्हणजे पोलीस चौकीच्या प्रमुखांनी ही घटना कॅमेऱ्यात कैद करणाऱ्यालाच मारहाण केली.
मध्यप्रदेश के टीकमगढ़ ज़िले के अक्टौहा में मोबाइल चोरी के शक में एक मासूम को दी गयी अमानवीय व तालिबानी सजा…
— Narendra Saluja (@NarendraSaluja) October 18, 2022
इस पूरे मामले की जाँच हो , दोषियों पर कड़ी से कड़ी कार्यवाही हो..
एक मासूम के साथ किसने इन्हें यह तालिबानी कृत्य करने का अधिकार दिया..? pic.twitter.com/a42n626Xus
आरोपी अजित राजपूत याने मोबाइल चोरल्याच्या संशयावरून १२ वर्षांच्या बालकाला बेदम मारहाण केली व नंतर विहिरीत लटकविले. या घटनेमुळे मुलाला मानसिक धक्का बसला आहे.