पंजाबमधील रावी नदीत आढळली संशयास्पद बोट, सर्च ऑपरेशन जारी
By admin | Published: October 4, 2016 12:35 PM2016-10-04T12:35:55+5:302016-10-04T12:41:22+5:30
पंजाबमध्ये मंगळवारी सकाळी रावी नदीच्या पात्रामध्ये एक संशयित बोट आढळून आली आहे. बीएसएफच्या जवानांनी ही संशयित बोट ताब्यात घेतली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
पंजाब, दि.4 - पंजाबमध्ये मंगळवारी सकाळी रावी नदीच्या पात्रामध्ये एक संशयित बोट आढळून आली आहे. बीएसएफच्या जवानांनी ही संशयित बोट ताब्यात घेतली आहे. या बोटीवर पाकिस्तानचे निशाण असल्याचीही माहिती समोर आली आहे.
ही बोट दहशतवाद्यांची असल्याचा संशय असल्यामुळे याबाबत अधिक तपास सुरू आहे. तसंच आसपासच्या परिसरात हायअलर्ट जारी करुन सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे.
डेरा बाबा नानक पोस्टजवळ देखील संशयास्पद हालचाली बीएसएफच्या जवानांना आढळून आल्या. काही दिवसांपूर्वी, गुजरातमधील पोरबंदरजवळ संशयास्पद बोट आढळली आहे. 'समुद्र पावक' या गस्त घालणा-या बोटीतील कोस्ट गार्डच्या जवानांना ही बोट आढळली. यानंतर त्यांनी बोटीसहीत 9 जणांना ताब्यात घेतले.
Punjab police carry out search operations in Shikar Mashia area (Dera Baba Nanak) of Gurdaspur sector after suspected movement were seen.
— ANI (@ANI_news) October 4, 2016
आणखी बातम्या
उरी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक करुन दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. यामुळे चवताळलेल्या पाकिस्तानकडून सीमारेषेवर घुसखोरी आणि शस्त्रसंधी उल्लंघनामध्ये वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. गुप्तचर यंत्रणांनी किनारपट्टी परिसरात सतर्कतेचा इशारा दिला आहे. त्यामुळे किनारपट्टीवर नौदल आणि तटरक्षकांनी कडेकोट सुरक्षाव्यवस्था तैनात केली आहे.