केरळमधील गरोदर महिला पतीसह ISIS मध्ये भरती झाल्याचा संशय

By admin | Published: July 11, 2016 11:47 AM2016-07-11T11:47:18+5:302016-07-11T11:47:18+5:30

लग्नानंतर इस्लाममध्ये धर्मातरण केलेली गरोदर महिला आपल्या पतीसह इसीसमध्ये भरती झाली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे

Suspected ISIS recruitment with pregnant woman husband in Kerala | केरळमधील गरोदर महिला पतीसह ISIS मध्ये भरती झाल्याचा संशय

केरळमधील गरोदर महिला पतीसह ISIS मध्ये भरती झाल्याचा संशय

Next
>ऑनलाइन लोकमत - 
थिरुवनंतपुरम , दि. 11 - लग्नानंतर इस्लाममध्ये धर्मातरण केलेली गरोदर महिला आपल्या पतीसह इसीसमध्ये भरती झाली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. निमिशा नाव असलेल्या या 25 वर्षीय तरुणीची आई बिंदू यांनी याप्रकरणी मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांची भेट घेतली असून चौकशीची मागणी केली आहे. केरळमधील 15 लोक इसीसमध्ये भरती झाला असल्याचा संशय आहे ज्यामध्ये निमिशादेखील आपल्या पतीसह सामील असण्याची शक्यता आहे. 
 
'मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी तपासात प्रगती होत असल्याचं सांगितलं', असल्याची माहिती बिंदू यांनी दिली आहे. बिंदू यांनी मुलगी निमिषा बेपत्ता झाल्यानंतर याचिका दाखल करत चौकशीची मागणी केली होती. पश्चिम आशियात गेलेले केरळातील 15 तरुण बेपत्ता झाले असून ते इस्लामिक स्टेट (आयएस) या खतरनाक अतिरेकी संघटनेत सहभागी झाले असावेत, असा संशय व्यक्त केला जात आहे. याची चौकशी करण्याचे आदेश केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांनी दिले आहेत.
 
'माझी मुलगी निमिषा तिच्या पतीसह 16 मे रोजी माझी भेट घेण्यासाठी आली होती. 18 मे रोजी तिने मला फोन केला होता. काही कामाच्या निमित्ताने आम्ही श्रीलंकेला जात असल्याचं तिने मला फोनवरुन सांगितलं. मी तिला वारंवार कुठून बोलत आहेस विचारत होती, पण तिने माहिती देण्यास नकार दिला. मी तिला जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला पण मला अपयश आलं. 4 जूनपर्यंत मला तिच्याकडून मेसेजही येत होते. पण त्यानंतर तिची काहीच माहिती मिळाली नाही', अशी माहिती बिंदू यांनी दिली आहे. 
 
'निमिशा कॉलेजमध्ये शिकत असताना तिची भेट बेक्सिन या ख्रिश्चन तरुणाशी झाली होती. नोव्हेंबर 2015 मध्ये दोघांनी लग्न केलं. लग्नानंतर दोघांनीही  इस्लाममध्ये धर्मातरण केलं होतं', असं बिंदू यांनी सांगितलं आहे.
 
कसारगोड परिसरातील अजून पाच कुटुंबांतील सदस्य बेपत्ता आहेत. या कुटुंबांनीदेखील याचिका दाखल करुन चौकशीची मागणी केली आहे. काँग्रेस वरिष्ठ नेते रमेश चेन्निथला यांनी लवकराच लवकर तपास करुन बेपत्ता झालेल्यांची माहिती मिळवण्याची मागणी केली आहे. 'बेपत्ता झालेले लोक इसीसमध्ये भरती झाले आहेत', असं म्हणू शकत नाही असंही रमेश चेन्निथला बोलले आहेत.
 
केरळातील कासरगोड आणि पलक्कड जिल्ह्यातील हे तरुण आहेत. ते धार्मिक शिक्षणासाठी पश्चिम आशियात गेले होते. हे सर्वजण ३0 वर्षांच्या आतील असून, उच्च शिक्षित आहेत. काही जण डॉक्टर आहेत. गेल्या महिनाभरापासून त्यांच्याशी संपर्क होऊ न शकल्यामुळे त्यांचे कुटुंबीय चिंतित झाले आहेत. त्यांना कट्टरपंथी बनवून आयएसमध्ये भरती करण्यात आले असावे, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या कुटुंबियांनी एका खासदारासह काही स्थानिक प्रतिनिधींशी संपर्क साधून त्यांना शोधण्यास मदत करण्याची विनंती केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले.
 

Web Title: Suspected ISIS recruitment with pregnant woman husband in Kerala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.