बलात्कारी बाबा राम रहीमच्या डे-यात 600 जणांना गाडल्याचा संशय
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2017 03:59 PM2017-09-20T15:59:22+5:302017-09-20T16:01:35+5:30
सिरसा, दि. 20 - बलात्कारी बाबा राम रहीम आणि त्याच्या डेरा सच्चा सौदाबद्दल दररोज धक्कादाय माहिती समोर येत आहे. डे-यात 600 जणांपेक्षा आधिक लोकांची हाडे आणि सांगाडे पुरले असल्याची धक्कादाक माहिती समोर आली आहे. गुरुमीत राम रहिम याला दोन साध्वींवर बलात्कार केल्याप्रकरणी 20 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. सध्या त्याला रोहतक येथील तुरुंगात ठेवण्यात आले आहे.
लोकांना मारून त्यांचे मृतदेह इथे पुरले जात असतील, अशा अंगानेही पोलीस तपास करत आहेत. काही दिवसांपूर्वी एका वृत्तवाहीनीशी बोलताना डे-याच्या काही माजी अनुयायांनी दावा केला होता की, डेरा प्रमुखांविरोधात आवाज उठवणा-यांना मारून त्यांचे मृतदेह डे-याच्या जमीनीत पुरले जात होते.
डेरा सच्चा सौदाची अध्यक्ष विपासना इंसा आणि डे-याचा उपाध्यक्ष डॉ. पीआर नॅन यांची हरियाणा पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. पोलिसांना आशा आहे की, या दोघांकडून डे-या संबंधीत अनेक पुरावे हाती येऊ शकतात. पोलिसांना तपासादरम्यान असाही सुगावा लागलाय की, सिरसा येथील डेरा मुख्यालयाच्या जमिनीत आणि शेतात साधारण 600 पेक्षा जास्त लोकांची हाडे आणि सांगाडे पुरले आहेत. डॉ. पीआर नॅन ने एसआयटीसमोर तसे स्विकारही केले आहे.
डॉ. नॅनने पोलिसांना सांगितले की, डे-यात मोक्ष मिळवण्यासाठीही मॄतदेह गाडले जात होते. भाविकांमध्ये असा विश्वास होता की, डे-याच्या जमिनीत त्यांचा मृतदेह दफन केल्यास त्यांना मोक्ष मिळेल. याच कारणाने डे-याच्या जमिनीत 600 लोकांच्या अस्थी आणि सांगाडे आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जमीनीतील सांगाडे बाहेर काढण्यासाठी लवकरच कारवाई सुरू केली जाईल. दुसरीकडे डे-याचे अनेक गुपितं जाणून घेण्यासाठी राम रहीमची मानलेली मुलगी हनीप्रीतचा युद्धपातळीवर शोध घेत आहे.
राम रहिम तुरुंगात 20 रुपये रोजगारावर करणार भाजी लागवडीचे काम
सध्या राम रहिमला रोहतक येथील तुरुंगात ठेवण्यात आले आहे. त्यामुळे राम रहिम तुरुंगात काम करत असेल, याबाबत अनेक तर्क-वितर्क लावण्यात आले. मात्र, त्याला तुरुंग प्रशासनाने भाजी लागवडीचे काम दिले आहे. यासाठी त्याला दिवसातील 8 तास काम केल्याबद्दल 20 रुपयांची मजुरी मिळणार आहे.
मोस्ट वाँटेड लिस्टमध्ये हनीप्रीत टॉपला, नेपाळमध्ये असल्याचा संशय
डेरा सच्चा सौदाचा प्रमुख राम रहीम याला 25 ऑगस्टला बलात्कार प्रकरणी दोषी ठरविण्यात आले. यानंतर पंचकुला, सिरसा व हरयाणाच्या अन्य भागांत झालेल्या हिंसाचारप्रकरणी हरयाणा पोलिसांनी 43 जणांची मोस्ट वाँटेड लिस्ट जाहीर केली आहे. या लिस्टमध्ये राम रहीमची मानस मुलगी हनीप्रीत सिंग आणि डेसा सच्चा सौदाचा प्रवक्ता आदित्य इन्सा यांची नावे टॉपला आहेत. डेरा सच्चा सौदाच्या अनुयायांनी 25 ऑगस्टला हिंसाचार माजवला. या हिंसाचारात 38 जणांचा मृत्यू झाला. तसेच अनेक जण जखमी झाले. तसेच, यामध्ये पोलिसही जखमी झाले. दरम्यान, या हिंचारानंतर हनीप्रीत सिंग फरार आहे. हनीप्रीत हिच्यासह डेरा सच्चा सौदाच्या इतर फरार अनुयायांना शोधण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.
राम रहीमबद्दलचे 10 खळबळजनक खुलासे-
1. कोर्टात न्यायाधिशांनी राम रहीमला बलात्काराबाबत विचारणा केली असता मी नपुंसक आहे, मी बलात्कार कसा करू शकतो असं राम रहीमकडून सांगण्यात आलं.
2. राम रहीमची प्रकृती खराब होत आहे कारण ते सेक्स एडिक्ट आहेत असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. ते ऑस्ट्रेलियाहून सेक्ससाठी औषधं मागवायचे असा खुलासा एका रिपोर्टमधून झाला आहे.
3. हनीप्रीत राम रहीमची दत्तक घेतलेली मुलगी आहे. मात्र, बलात्काराच्या आरोपात बाबा तुरूंगात गेल्यानंतर राम रहीमचे हनीप्रीत सोबतच जवळचे संबंध असल्याचा खुलासा झाला आहे.
5. राम रहीमवर जवळपास 400 माणसांना नपुंसक बनवण्याचा आरोप लावण्यात आला आहे. याविरोधात राम रहीमविरोधात कोर्टात केस सुरू आहे.
6. कोर्टाच्या आदेशानुसार डे-याची झाडाझडती घेतल्यानंतर अनेक खुलासे झाले आहेत. बाबाच्या डे-यात गर्भपात सेंटर देखील मिळालं आहे.
7. या दरम्यान राम रहीमची गुहा देखील ब-याच चर्चेत राहिली. डे-यात अशाप्रकारचे अनेक सुरंग असून ते थेट बाबाच्या बेडरूमजवळ निघतात असाही खुलासा झाला आहे.
8. राम रहीम आपल्या डे-यात स्वतःचं प्लॅस्टिकचं चलन वापरत होता. डे-यामध्ये प्लॅस्टिकचं चलन घ्यावं लागत होतं.
9. राम रहीमला शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर कोर्टातून राम रहीमला पळवून नेण्याचा कट होता. दत्तक मुलगी हनीप्रीतसोबत तो पळून जाणार होता असाही खुलासा झाला आहे. याप्रकरणी पोलीस हनीप्रीतचा कसून शोध घेत आहेत.
10. राम रहीमला शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर हरियाणामध्ये मोठ्या प्रमाणात हिंसा झाली होती. हनीप्रीतकडे असलेली एक लाल बॅग म्हणजे हिंसा भडकावण्याचा इशारा होता असाही खुलासा आता झाला आहे.