एस.टी.चे तीन कर्मचारी निलंबित

By admin | Published: July 5, 2016 12:27 AM2016-07-05T00:27:40+5:302016-07-05T00:27:40+5:30

जळगाव : राज्य परिवहन महामंडळाच्या जळगाव विभागाच्या विभाग नियंत्रकांना अरेरावी केल्या प्रकरणी आज विभागातील तीन कर्मचार्‍यांना निलंबित करण्याची कारवाई विभागीय कार्यालयाकडून करण्यात आली. यामुळे जळगाव आगारात खळबळ उडाली आहे. या कारवाईस आगार व्यवस्थापक एस.बी. खडसे यांनीही दुजोरा दिला आहे.

Suspended ST employees | एस.टी.चे तीन कर्मचारी निलंबित

एस.टी.चे तीन कर्मचारी निलंबित

Next
गाव : राज्य परिवहन महामंडळाच्या जळगाव विभागाच्या विभाग नियंत्रकांना अरेरावी केल्या प्रकरणी आज विभागातील तीन कर्मचार्‍यांना निलंबित करण्याची कारवाई विभागीय कार्यालयाकडून करण्यात आली. यामुळे जळगाव आगारात खळबळ उडाली आहे. या कारवाईस आगार व्यवस्थापक एस.बी. खडसे यांनीही दुजोरा दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव आगारात बस मागे घेण्याच्या कारणावरुन तत्कालीन विभाग नियंत्रक राजीव साळवे यांच्याशी तीन कर्मचार्‍यांनी वाद घातला होता. त्यानंतर स्थानकासमोर मंडप टाकून माईकद्वारे विभाग नियंत्रकांशी अरेरावी केल्याने त्या वेळी या कर्मचार्‍यांवर कारवाईची शिफारस करण्यात आली होती.
त्यानुसार सोमवार, ४ जुलै रोजी या तीन कर्मचार्‍यांच्या निलंबनाचे आदेश विभागीय कार्यालयाकडून काढण्यात आले. या संदर्भात आगार प्रमुख एस.बी. खडसे यांना विचारले असता त्यांनी यास दुजोरा देऊन विभागीय कार्यालयाने ही कारवाई केली असल्याचे सांगितले. निलंबित केलेल्या कर्मचार्‍यांची नावे समजू शकली नाही. यामध्ये एक लिपीक, एक चालक व एका वाहकाचा समावेश असल्याचे समजते. या संदर्भात विभाग नियंत्रक चेतना खिरवाडकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.

Web Title: Suspended ST employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.