ABVP च्या दोन सदस्यांचं निलंबन, सेहवागकडूनही खुलासा

By admin | Published: March 1, 2017 12:55 PM2017-03-01T12:55:47+5:302017-03-01T13:44:35+5:30

विरेंद्र सेहवागने आपल्या ट्विटवर स्पष्टीकरण देत आपण फक्त विनोद म्हणून ते ट्विट केलं होतं, कोणाचीही थट्टा करण्याच्या हेतूने नव्हतं असं स्पष्टीकरण दिलं आहे

Suspension of ABVP two members, disclosed by Sehwag | ABVP च्या दोन सदस्यांचं निलंबन, सेहवागकडूनही खुलासा

ABVP च्या दोन सदस्यांचं निलंबन, सेहवागकडूनही खुलासा

Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 1 - दिल्ली विद्यापीठाची विद्यार्थिनी गुरमेहर कौरला बलात्काराच्या आणि जिवे मारण्याच्या धमक्या मिळाल्यानंतर विद्यापीठ आणि दिल्लीतील वातावरण भलतेच तापले असून सोशल मीडियावर समर्थक आणि विरोधकांचं युद्धच पेटलं आहे. विरेंद्र सेहवागने आपल्या ट्विटवर स्पष्टीकरण देत आपण फक्त विनोद म्हणून ते ट्विट केलं होतं, कोणाचीही थट्टा करण्याच्या हेतूने नव्हतं असं सांगितलं आहे. तर दुसरीकडे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आपल्या दोन सदस्यांचं निलंबन केलं आहे. 
 
कॅम्पस परिसरात झालेल्या हिंसाचारात तसंच राजकीय नेते आणि सेलिब्रेटींच्या शाब्दिक चकमकीत सहभागी झालेल्या दोन सदस्यांना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने निलंबित केलं आहे. अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेच्या समर्थकांवर हल्ला केल्याप्रकरणी यांना अटक करण्यात आली होती. बेशिस्तपणाचा ठप्पा ठेवत त्यांच्यावर ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. 
 
सेहवागने आपल्या ट्विटवरुन झालेल्या गदारोळानंतर स्पष्टीकरण दिलं असून 'आपण फक्त विनोद म्हणून ते ट्विट केलं होतं, कोणाचीही थट्टा करण्याच्या हेतूने नव्हतं', असा खुलासा केला आहे. 'सहमत किंवा असमहत असणं हा मुद्दाच नव्हता. तिला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. तिला बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकी देणारे समाजातील अत्यंत खालच्या स्तरातील आहेत. प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे, मग ती गुरमेहर कौर असो अथवा फोगत भगिनी', असं विरेंद्र सेहवागने ट्विटमधून सांगितलं आहे.
 

Web Title: Suspension of ABVP two members, disclosed by Sehwag

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.