NDTVवरील बंदीला केंद्राची स्थगिती
By admin | Published: November 7, 2016 07:59 PM2016-11-07T19:59:51+5:302016-11-07T20:11:24+5:30
केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीवर घातलेल्या एक दिवसाच्या बंदीला अखेर स्थगिती दिली आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 7 - केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीवर घातलेल्या एक दिवसाच्या बंदीला अखेर तात्पुरती स्थगिती दिली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री वेंकय्या नायडू यांनी ही घोषणा केली आहे. एनडीटीव्हीनं आजच या बंदीविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून दाद मागितली होती. त्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं उद्या सुनावणीही ठेवली होती. मात्र अचानक माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं ही बंदी उठवल्यानं केंद्र सरकार बॅकफूटवर गेलं आहे.
गेल्याच आठवड्यात पठाणकोट दहशतवादी हल्ल्याची संवेदनशील माहिती प्रसारित केल्याचा ठपका ठेवत केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या एका समितीने 9 नोव्हेंबर रोजी एनडीटीव्हीचे प्रसारण एका दिवसासाठी बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. या माहितीचा उपयोग दहशतवाद्यांचे हँडलर्स करू शकले असते, असंही त्यावेळी माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं म्हटलं होतं.
(बंदीविरोधात एनडीटीव्ही सर्वोच्च न्यायालयात)
('एनडीटीव्ही'नंतर आता 'या' दोन चॅनलवर बंदी)
दरम्यान नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी एनडीटीव्हीला जानेवारी महिन्यातच कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. एनडीटीव्हीवरील एका दिवसाच्या बंदीचा सर्वत्र निषेध होत असतानाच हा प्रकार म्हणजे माध्यम स्वातंत्र्यावर आघात आहे, अशी टीका सर्वस्तरांतून होत होती. या सर्व पार्श्वभूमीवर माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं या बंदीला स्थगिती दिल्याची आता चर्चा आहे.
#FLASH: I&B Ministry sources say ministry reviewing NDTV India November 9 blackout case, put on hold for now.
— ANI (@ANI_news) November 7, 2016