बॅँक खातील सीलच्या कारवाईस स्थगिती मनपास दिलासा: १ एप्रिलला कामकाज

By admin | Published: March 23, 2016 12:09 AM2016-03-23T00:09:54+5:302016-03-23T00:09:54+5:30

जळगाव :जळगाव : मनपाची मालमत्ता व बॅक खाती सील करण्याच्या डीआरटीच्या प्रस्तावित कारवाईस डीआरएटी दिल्लीने मनाई हुकूम केला असून याप्रश्नी आता दिल्ली येथील ट्रीब्युनलपुढे १ एप्रिल रोजी कामकाज होणार आहे. ३४१ कोटींच्या डीआरटीच्या संभावीत कारवाईस स्थगिती मिळावी अशी आता मनपाची मागणी आहे. तूर्तास बॅँक खातील सील होणार नसल्याने मनपास मोठा दिलासा मिळाला आहे.

Suspension for Bank seal action: Dealing on April 1 | बॅँक खातील सीलच्या कारवाईस स्थगिती मनपास दिलासा: १ एप्रिलला कामकाज

बॅँक खातील सीलच्या कारवाईस स्थगिती मनपास दिलासा: १ एप्रिलला कामकाज

Next
गाव :जळगाव : मनपाची मालमत्ता व बॅक खाती सील करण्याच्या डीआरटीच्या प्रस्तावित कारवाईस डीआरएटी दिल्लीने मनाई हुकूम केला असून याप्रश्नी आता दिल्ली येथील ट्रीब्युनलपुढे १ एप्रिल रोजी कामकाज होणार आहे. ३४१ कोटींच्या डीआरटीच्या संभावीत कारवाईस स्थगिती मिळावी अशी आता मनपाची मागणी आहे. तूर्तास बॅँक खातील सील होणार नसल्याने मनपास मोठा दिलासा मिळाला आहे.
मनपाने हुडकोकडून घेतलेल्या कर्जाची थकबाकी वसुलीसाठी हुडकोने डीआरटीत केस केली आहे. त्यात डीआरटीने मनपावर ३४१ कोटींची डीक्री नोटीसही बजावली होती. तसेच मनपाचे खाते सील करण्याचे आदेश दिले होते. त्याविरोधात मनपाने मुंबई उच्च न्यायालयात अपिल दाखल केले होते. त्यावर न्यायालयाने बँक खाते सीलच्या कारवाईला स्थगिती देत कर्जफेडीसाठी शासनाने कृतीआराखडा सादर करण्याचे आदेश दिले होते. दरमहा ३ कोटी भरावे असे यात निर्देश होते. हुडको कर्जाच्या तडजोडी संदर्भातील हालचालींना मनपाकडून गती देण्यात आली होती. या संदर्भात महापौर नितीन ल‹ा व उपमहापौर ललित कोल्हे यांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट हा विषय त्यांच्या कानावर घालून मदतीबाबत विनंती केली होती. याप्रश्नी शासनाने वित्त विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली शासनाचे अधिकारी, मनपा आयुक्त व हुडकोचे प्रतिनिधी यांची समिती नियुक्त केली. त्या समितीची एक बैठकही पार पडली आहे. या संदर्भात तडजोड अंतिम टप्प्यात आलेली असताना हुडकोने अचानक डीआरटीत पुन्हा पत्र देऊन मनपाची सर्व बँक खाती सील करण्याची मागणी केली होती. त्यामुळे मनपाने दिल्ली येथे डीआरटीएकडे धाव घेतली होती. डीआरएटीजे रणजितसिंग यांच्यापुढे हे कामकाज झाले. मुख्य लेखाधिकारी चंद्रकांत खरात हे यासाठी नवीदिल्ली येथे दोन दिवसांपासून होते.
मनपास दिलासा
डीआरटीएने याप्रश्नी डीआरटीने बॅँक खाती व मालमत्ता सील करू नये असा मनाई हुकूम दिला आहे. त्यामुळे मनपास दिलासा मिळाला आहे. तसेच आता ३४१ कोटींच्या वसुलीसही स्थगिती मिळावी असे मनपाचे प्रयत्न असून या विषयावर येत्या १ एप्रिल रोजी कामकाज होणार आहे.

Web Title: Suspension for Bank seal action: Dealing on April 1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.