राहुल गांधींवरील भिवंडीतील बदनामी खटल्यास स्थगिती

By admin | Published: May 8, 2015 01:24 AM2015-05-08T01:24:26+5:302015-05-08T01:24:26+5:30

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी महात्मा गांधींची हत्या केली, अशा आशयाच्या विधानाबद्दल काँग्रेसचे उपाध्यक्ष व अमेठीचे खासदार राहुल

Suspension if Rahul Gandhi is facing defamation | राहुल गांधींवरील भिवंडीतील बदनामी खटल्यास स्थगिती

राहुल गांधींवरील भिवंडीतील बदनामी खटल्यास स्थगिती

Next

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी महात्मा गांधींची हत्या केली, अशा आशयाच्या विधानाबद्दल काँग्रेसचे उपाध्यक्ष व अमेठीचे खासदार राहुल गांधी यांच्या विरुद्ध भिवंडी येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कार्यालयात सुरू असलेल्या बदनामी खटल्यास सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी अंतरिम स्थगिती दिली. दंडाधिकाऱ्यांनी काढलेल्या समन्सनुसार राहुल गांधी यांना ८ मे रोजी भिवंडी न्यायालयात आरोपी म्हणून हजर व्हायचे होते.
राहुल यांनी केलेली रिट याचिका न्या. दीपक मिश्रा व न्या. प्रफुल्लचंद्र पंत यांच्या खंडपीठाने दाखल करून घेतली व पुढील सुनावणीपर्यंत भिवंडी न्यायालयातील कामकाज स्थगित राहील, असा निर्देश दिला. राहुल गांधी यांनी या याचिकेत बदनामीच्या फौजदारी गुन्ह्यासंबंधीच्या भारतीय दंड विधानातील ४९९ व ५०० या दोन कलमांच्या घटनात्मक वैधतेस आव्हान देण्यात आले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व भाजप नेते डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी याआधी केलेल्या अशाच याचिकाही न्यायालयाने दाखल करून घेतल्या असून त्यांच्यावर ८ जुलै रोजी सुनावणी व्हायची आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)

 

Web Title: Suspension if Rahul Gandhi is facing defamation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.