लष्कराची बस कोसळण्यामागे घातपाताचा संशय; ७ जवानांचा झाला होता मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2022 06:42 AM2022-05-30T06:42:02+5:302022-05-30T06:42:07+5:30

बसमध्ये महाराष्ट्रातील २ जवानांसह ७ जवानांचा मृत्यू झाला, तर १९ जवान जखमी झाले.

Suspicion of assassination after army bus crash; 7 soldiers were killed | लष्कराची बस कोसळण्यामागे घातपाताचा संशय; ७ जवानांचा झाला होता मृत्यू

लष्कराची बस कोसळण्यामागे घातपाताचा संशय; ७ जवानांचा झाला होता मृत्यू

Next

- सुरेश डुग्गर

जम्मू : लष्कराच्या जवानांना घेऊन जाणारी बस लेहजवळ नदीत काेसळून झालेल्या अपघातात ७ जवानांचा मृत्यू झाला. मात्र, हा घातपात असल्याची शक्यता आहे. बस काेसळण्यापूर्वीच बसचालकाने बाहेर उडी मारली. ताे फरार असून, त्याच्याविराेधात गुन्हा दाखल केला आहे. 

बसमध्ये महाराष्ट्रातील २ जवानांसह ७ जवानांचा मृत्यू झाला, तर १९ जवान जखमी झाले. अहमद शाह या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.  बस काेसळण्यापूर्वी त्याने उडी मारून स्वत:चे प्राण वाचविले. मात्र, ताे तेव्हापासून फरार आहे. अपघातातून बचावलेल्या जवानांकडून ही माहिती मिळाली. 

Web Title: Suspicion of assassination after army bus crash; 7 soldiers were killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.