बर्‍हाणपुरच्या शिक्षिकेचा संशयास्पद मृत्यू

By admin | Published: November 22, 2015 11:15 PM2015-11-22T23:15:51+5:302015-11-22T23:15:51+5:30

जळगाव: बर्‍हाणपुर येथे शिक्षिका असलेल्या प्रिया भारत लायंगे (वय ३० रा.जवेरी बाजार, बर्‍हाणपुर) या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. तालुक्यातील म्हसावद जवळ कुर्‍हाडदे शिवारात रेल्वे लाईनजवळ रविवारी दुपारी बारा वाजता कुजलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळून आला आहे. त्यामुळे ही आत्महत्या आहे की घातपात याबाबत पोलीसही गोंधळात पडले आहेत. या घटनेबाबत सध्या तरी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Suspicious death of a teacher of Bherhanpur | बर्‍हाणपुरच्या शिक्षिकेचा संशयास्पद मृत्यू

बर्‍हाणपुरच्या शिक्षिकेचा संशयास्पद मृत्यू

Next
गाव: बर्‍हाणपुर येथे शिक्षिका असलेल्या प्रिया भारत लायंगे (वय ३० रा.जवेरी बाजार, बर्‍हाणपुर) या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. तालुक्यातील म्हसावद जवळ कुर्‍हाडदे शिवारात रेल्वे लाईनजवळ रविवारी दुपारी बारा वाजता कुजलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळून आला आहे. त्यामुळे ही आत्महत्या आहे की घातपात याबाबत पोलीसही गोंधळात पडले आहेत. या घटनेबाबत सध्या तरी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मोबाईलवरुन पटली ओळख
प्रिया यांचा मृतदेह रेल्वे लाईनजवळ झाडांच्या झुडपात पडलेला होता. त्याची दुर्गंधी येत असल्याने कुर्‍हाडदे येथील लोकांनी ही माहिती पोलीस पाटील सुरेश रामदास न्हायदे यांना कळविली. त्यांनी म्हसावद दूरक्षेत्राचे कर्मचारी सुशील मगरे यांना ही माहिती दिली. मगरे यांनी घटनास्थळावर भेट देवून पाहणी केली तर मृतदेह कुजलेला होता. महिलेजवळ असलेला मोबाईल बंद होता. त्यातील सीम कार्ड काढून ते स्वत:च्या मोबाईलमध्ये टाकले. त्यानंतर त्यांच्या परिवाराला घटनेची माहिती दिली. त्यानंतर दुपारी त्यांचे कुटूंब घटनास्थळावर दाखल झाले. प्रिया यांचे पती खासगी कंपनीत नोकरीला आहेत तर त्यांना दोन मुले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
जागेवरच केले शवविच्छेदन
मृतदेह कुजलेला असल्याने तेथून हलविणे शक्य नव्हते. मगरे यांनी ही माहिती उपनिरीक्षक अशोक अहिरे यांना दिली. त्यानंतर अहिरे हे जळगाव येथून डॉक्टरांचे पथक घेवून घटनास्थळावर गेले. जागेवरच शवविच्छेदन करुन तेथेच अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, रेल्वेतून उडी मारल्याने त्यांनी आत्महत्या केली असावी किंवा घातपात अशा दोन्ही शक्यता पोलिसांनी वर्तविल्या आहेत.
रागात निघाल्या घरुन
प्रिया यांचे कुटूंबात काही तरी वाद झाले होते, त्या रागातच त्यांनी मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला. घरुन निघण्यापुर्वी त्यांनी आईला मुंबईला जात असल्याचा फोन केला होता. घटनेची माहिती मिळताच कुटूंबातील पती, आई, वडील व अन्य नातेवाईक दोन गाड्या भरुन म्हसावदला आले होते. मृतदेह पाहताच त्यांनी प्रचंड आक्रोश केला.

Web Title: Suspicious death of a teacher of Bherhanpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.