मणिपूरमधील इंफाळ विमानतळाच्या हवाई क्षेत्रात दिसले संशयास्पद ड्रोन; तीन तास उड्डाणे उशीरा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2023 08:22 PM2023-11-19T20:22:17+5:302023-11-19T20:23:48+5:30
मणिपूर येथील इंफाळा विमानतळावर रविवारी संशायस्पद ड्रोन सापडले.
गेल्या काही दिवसांपासून मणिपूरमध्ये हिंसाचार सुरू आहे. आज राजधानी इंफाळच्या विमानतळाजवळ एक मानवरहित हवाई वाहन दिसले आहे. रविवारी दुपारी अडीच वाजता अचानक एक यूएव्ही दिसू लागल्याने इंफाळ विमानतळावर गोंधळ उडाला. यानंतर इंफाळ विमानतळावर येणारी आणि जाणारी सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली. इम्फाळच्या विमानतळावर जेथे UAV दिसले होते त्या विमानतळाचे नाव वीर टिकेंद्रजीत आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इंफाळला जाणारी आणि जाणारी काही उड्डाणे रद्द करण्यात आली आणि काही उड्डाणे इम्फाळ एअरफील्डवरून परतली आणि इतर ठिकाणी वळवण्यात आली. UAV हे ड्रोन असू शकते असा अंदाज वर्तवला जात आहे.
इस्त्रायलने लाँच केली एरो मिसायल डिफेन्स सिस्टीम; जाणून घ्या सविस्तर
कोलकाताहून एक विमान इंफाळमध्ये उतरणार होते, पण सुरक्षा यंत्रणांकडून परवानगी मिळेपर्यंत लँडिंग करू नका, असे सांगून ते थांबवण्यात आले. प्रवाशांनी भरलेल्या विमानाला इंफाळ विमानतळावर उतरण्यापासून २५ मिनिटे थांबवण्यात आले. नंतर त्याला गुवाहाटी येथे वळवण्यात आले.
UAV ची माहिती मिळाल्यानंतर, ३ उड्डाणे सुमारे ३ तास उड्डाणे थांबवण्यात आली आणि दोन उड्डाणे कोलकात्याच्या दिशेने वळवण्यात आली. मात्र, सायंकाळी सहाच्या सुमारास दिल्ली, पाटणा आणि गुवाहाटी या तीन विमानांनी उशिराने उड्डाण केले.
विमानतळावरील अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती अशी, इंफाळ नियंत्रित हवाई क्षेत्रामध्ये अज्ञात उडणारी वस्तू दिसल्याने, दोन उड्डाणे वळवण्यात आली आहेत आणि तीन उड्डाणांना उशीर झाला आहे. हिंसाचारग्रस्त राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती पाहता मणिपूर सरकारने इंटरनेट सेवांवरील बंदी पाच दिवसांसाठी २३ नोव्हेंबरपर्यंत वाढवली आहे.