उरीमधील आर्मी कॅम्पजवळ संशयास्पद हालचाली, गोळीबारानंतर शोधमोहीम सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2019 09:39 AM2019-02-11T09:39:55+5:302019-02-11T09:52:00+5:30
जम्मू-काश्मीरमधील उरी येथे असलेल्या लष्करी तळाजवळ संशयास्पद हालचाली नजरेत पडल्याचे वृत्त आहे.
श्रीनगर - जम्मू-काश्मीरमधील उरी येथे असलेल्या लष्करी तळाजवळ संशयास्पद हालचाली नजरेत पडल्याचे वृत्त आहे. येथील नियंत्रण रेषेजवळ असलेल्या मोहरा कॅम्पमध्ये काही संशयास्पद व्यक्तींना पाहिले गेले. त्यानंतर तिथे तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांमी गोळीबार केला. तसेच परिसराला घेराव घालण्यात आला असून, शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी दोन संशयास्पद व्यक्तींना पाहिले आहे. ही घटना पहाटे 30 वाजण्याच्या दरम्यानची आहे. गोळीबारामुळे काही लोकांना दुखापत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र आतापर्यंत कुणाचाही मृतदेह हाती लागलेला नाही. तसेच हा कुठल्याही प्रकारचा हल्ला असण्याच्या शक्यतेलाही पोलिसांनी दुजोरा दिलेला नाही.
J&K: Last night the security personnel of Army Artillery unit at Rajarwani, Uri detected some suspicious movement around the camp and opened fire. The area has been cordoned off and is being searched jointly by Police & Army. Two people are being examined. pic.twitter.com/yL2e4l3h5Y
— ANI (@ANI) February 11, 2019
याआधी उरी कॅपवर एक मोठा हल्ला झाला होता. 18-19 सप्टेंबर 2016 रोजी झालेल्या त्या हल्ल्यात 19 जवान शहीद झाले होते. त्यानंतर लष्कराने सर्जिकल स्ट्राइक करून या हल्ल्याचा बदला घेतला होता.
J&K: Visuals from Rajarwani, Uri where suspicious movement was detected around camp of Army Artillery unit last night following which a security personnel opened fire. Area cordoned off&is being searched by Police&Army. 2 ppl being examined.(Visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/S9oEgVnawZ
— ANI (@ANI) February 11, 2019