विमानतळापाशी उडणारी संदिग्ध वस्तू
By Admin | Published: January 28, 2016 01:13 AM2016-01-28T01:13:06+5:302016-01-28T01:13:06+5:30
दिल्लीच्या इंरिा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दिशेने एक मोठ्या फुग्याच्या आकाराची एक संदिग्ध वस्तू उडत असल्याची माहिती विमानतळ प्राधिकरणाच्या कार्यालयात संध्याकाळी
नवी दिल्ली : दिल्लीच्या इंरिा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दिशेने एक मोठ्या फुग्याच्या आकाराची एक संदिग्ध वस्तू उडत असल्याची माहिती विमानतळ प्राधिकरणाच्या कार्यालयात संध्याकाळी आल्यामुळे विमानतळ आणि आसपासच्या परिसरात अॅलर्ट जारी करण्यात आला. मात्र पोलिस वा सुरक्षा यंत्रणांना ती वस्तू दिसली नाही.
आकाशात सुमारे दीड किलोमीटर उंच अंतरावर पांढऱ्या आणि लाल रंगाच्या फुग्यासारखी दिसणारी आणि सुमारे एक मीटर रूंद आकाराची ही संदिग्ध वस्तू उडत असल्याचे गुरगाव- फरिदाबाद मार्गावरील हवाई दलाच्या स्टेशनवर तैनान असलेल्या सुरक्षा रक्षकाने पाहिले. त्याने लगेचच विमानतळ प्राधिकरणाच्या नियंत्रण कक्षाला त्याची माहिती दिली. गुरगाव पोलिसांच्या नियंत्रण कक्षाने लगेचच दिल्ली आणि फरिदाबाद पोलिसांना त्याबाबत अॅलर्ट दिला. सुरक्षा यंत्रणाही लगेचच सक्रिय झाल्या. त्या वस्तुचा शोध घेण्याचा आम्ही खूप प्रयत्न झाला, मात्र ती आम्हाला दिसली नाही, असे पोलिसांनी सांगितले. तरीही दिल्ली विमानतळावर अॅलर्ट रात्रीपर्यंत कायम होता.
प्रजासत्ताक दिनी राजस्थानच्या बारमेर या जिल्ह्णाच्या ठिकाणीही असाच एक फुग्याच्या आकाराची संदिग्ध वस्तू आकाशात उडत असल्याचे रहिवाशांनी पाहिली होती. त्यांनी त्याची माहिती पोलिसांना दिली होती. त्यानंतर हवाई दलाच्या सुखोई विमानाने आकाशातच तो फुगा नष्ट केला होता.