“जास्त बोलू नका, अनंतनागमध्ये ट्रान्सफर करेन”; भाजप नेत्याची पोलीस अधिकाऱ्याला धमकी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2021 02:07 PM2021-07-20T14:07:00+5:302021-07-20T14:07:29+5:30

मिदनापूरचे पोलीस अधिक्षक यांना जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला किंवा अनंतनागमध्ये बदली करण्याची धमकी सुवेंदू अधिकाऱ्यांनी दिल्याचे सांगितले जात आहे.

suvendu adhikari warns midnapore sp says do not do anything to risk of transfer to jammu kashmir | “जास्त बोलू नका, अनंतनागमध्ये ट्रान्सफर करेन”; भाजप नेत्याची पोलीस अधिकाऱ्याला धमकी

“जास्त बोलू नका, अनंतनागमध्ये ट्रान्सफर करेन”; भाजप नेत्याची पोलीस अधिकाऱ्याला धमकी

Next

कोलकाता:पश्चिम बंगालमध्ये भाजपला पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर ममता बॅनर्जी यांच्याविरोधात निवडणुकीत जिंकलेल्या सुवेंदू अधिकारी यांना विरोधी पक्षनेता बनवण्यात आले. मात्र, भाजपचा झालेला पराभव सुवेंद अधिकाऱ्यांना पचलेला दिसत नाही. कारण, काही नेत्यांच्या अती आत्मविश्वासामुळे भाजप पराभूत झाला, या शब्दांत अधिकारी यांनी पक्षाला घरचा अहेर दिला होता. आता मिदनापूरचे पोलीस अधिक्षक यांना जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला किंवा अनंतनागमध्ये बदली करण्याची धमकी सुवेंदू अधिकाऱ्यांनी दिल्याचे सांगितले जात आहे. (suvendu adhikari warns midnapore sp says do not do anything to risk of transfer to jammu kashmir)

ममता बॅनर्जी सरकार भाजप कार्यकर्त्यांना खोट्या आरोपांखाली फसवण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप सुवेंदू अधिकाऱ्यांनी केला आहे. तसेच आपल्याविरोधात सुरू असलेल्या चौकशीवर नाराजी व्यक्त करत मिदनापूरच्या पोलीस अधिक्षकांना धमकवल्याचे सांगितले जात आहे. तुम्हाला तुमची बदल जम्मू काश्मीरमधील अनंतनाग किंवा बारामुल्ला भागात व्हावी, असे वाटत नसेल, तर काहीही करू नका, अन्यथा धडा शिकवला जाईल, असा इशारा अधिकारी यांनी दिल्याचे सांगितले जात आहे. 

रतन टाटांनी गुंतवणूक केलेल्या Generic Aadhaar ची फ्रेंचायजी घ्या; गुंतवणूक छोटी, नफा मोठा!

माझ्या पाठीशी केंद्र सरकार आहे

ममता बॅनर्जी यांच्या भाच्याचे सर्व कॉल डिटेल्स माझ्याकडे आहेत. यात याच पोलीस स्थानकातून फोन केल्याचे दिसत आहे. तुम्हाला राज्य सरकारचा पाठिंबा असेल, तर माझ्या पाठीशी केंद्र सरकार आहे. भाजप कमकुवत आहे, असे समजू नका, या शब्दांत सुवेंदू अधिकारी यांनी पोलीस अधीक्षकांना सुनावल्याचे सांगितले जात आहे. पूर्व मिदनापूर जिल्ह्यातील कोंटाई येथील पोलीस स्थानकांना भाजपचे विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी आणि त्यांचे बंधू सौमेंदू अधिकारी यांच्याविरोधात तक्रार नोंदवण्यात आली आहे. तृणमूल काँग्रेसने ताडपत्री आणि मदत साहित्य चोरल्याचा आरोप केला आहे. याचीच चौकशी सुरू असून, अधिकाऱ्यांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. 

“टाटा, अंबानी, बिर्लांच्या बँक बॅलन्सशी सामान्यांचा काय संबंध, तो लोकांना कळायला हवा का?”

दरम्यान, काही नेत्यांच्या अती आत्मविश्वासामुळेच भाजपचा पराभव झाला. आपले लक्ष्य ठरवत असताना जमिनीवर काम करणेही तितकेच महत्वाचे आहे. ही सत्य परिस्थिती असून, यासाठी कठोर श्रम गरजेचे आहेत. पण यावेळी त्यांनी जमिनीवरील परिस्थिती कोणतीही माहिती घेतली नाही. याचा आपल्याला खूप मोठा फटका बसला, असे सांगत अधिकारी यांनी स्वपक्षावर निशाणा साधला. 
 

Web Title: suvendu adhikari warns midnapore sp says do not do anything to risk of transfer to jammu kashmir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.