स्वच्छ भारत यशस्वी असल्याचं ओरडत, विद्यार्थ्यांनी केली राहूल गांधींची पंचाईत
By admin | Published: November 25, 2015 03:20 PM2015-11-25T15:20:35+5:302015-11-25T15:30:44+5:30
पबमध्ये गेल्याबद्दल तथाकथित संस्कृतीरक्षकांनी एका मुलीला मारहाण केल्याचा दाखला देत, पबमध्ये जायचं का नाही हा निर्णय सर्वस्वी मुलींचा असल्याचे सांगत, काँग्रेस उपाध्यक्ष राहूल गांधी
Next
>ऑनलाइन लोकमत
बेंगलूर, दि. २५ - भारतीय जनता पार्टीवर टीका करताना राहूल गांधींनी बेंगलूरमध्ये स्वच्छ भारत व मेक इंन इंडिया ही अभियानं अयशस्वी असल्याची टीका करताना विद्यार्थ्यांनाच तसा प्रश्न विचारला. त्यावर विद्यार्थ्यांनी जोरजोरात ओरडून हे कार्यक्रम यशस्वी झाल्याचे सांगितले आणि पंचाईत झालेल्या राहूल गांधींना धक्काच बसल्याचे दिसून आले. त्यांनी अविश्वासाने तीन तीन वेळा विद्यार्थ्यांना विचारले स्वच्छ भारत यशस्वी आहे का, माझ्या मते नाही, त्यावेळी सगळ्या विद्यार्थ्यांनी जोरजोरात यस यसचा आरडा ओरडा केला.
बेंगलूरमध्ये पबमध्ये गेल्याबद्दल तथाकथित संस्कृतीरक्षकांनी एका मुलीला मारहाण केल्याचा दाखला देत, पबमध्ये जायचं का नाही हा निर्णय सर्वस्वी मुलींचा असल्याचे सांगत, काँग्रेस उपाध्यक्ष राहूल गांधी यांनी भाजपा परीवारातील सांस्कृतिक दहशतवाद पसरवणा-या आक्रमक संस्थांवर टीका केली आहे. बेंगलूरमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची संवाद साधताना गांधींनी भाजपाला संवाद नको असल्याचे सांगताना संसदेमध्ये काँग्रेसच्या खासदारांना बोलू दिले जात नसल्याची तक्रार केली. तसेच, लँड बिल आणि जीएसटी बिल काँग्रेसचीच आणली असल्याचे सांगताना भाजपा आणू पाहणारी ही बिले सदोष असल्याचा दावा केला. आम्हाला प्रस्तावित बिलांमध्ये सुधारणा हव्या आहेत, परंतु भाजपा संवादच करू इच्छित नाही त्यामुळे आम्हाला संसदेचं कामकाज व्यत्यय आणून लोकांच्या विरोधी असलेल्या प्रस्तावांना थांबवायला लागत असल्याचं गांधी म्हणाले.
भाजपा सगळ्या स्तरांवर अपयशी ठरल्याचा आरोप राहूल गांधींनी केल्यावर उपस्थित विद्यार्थ्यांनी स्वच्छ भारत अभियान यशस्वी असल्याचे जोरजोरात सांगितले आणि गांधींना धक्काच बसला. मेक इन इंडिया हा कार्यक्रमही अपयशी असल्याचे गांधी म्हणाले, परंतु हा कार्यक्रमही यशस्वी होत असल्याचा ओरडा विद्यार्थ्यांनी केला आणि गांधींची किंचितशी पंचाईत झाली.