Video - "स्वदेशीचा अर्थ विदेशी वस्तूंवर सरसकट बहिष्कार टाकणं नाही"
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2020 09:37 AM2020-08-13T09:37:42+5:302020-08-13T09:41:07+5:30
विदेशी वस्तूंचा वापर टाळून स्वदेशी वस्तूंचा वापर करण्याचा सल्ला दिला जात आहे.
नवी दिल्ली - भारत आणि चीनदरम्यान असलेला तणाव वाढत आहे. मोदी सरकारने काही दिवसांपूर्वी चीनला मोठा दणका दिला. लोकप्रिय अॅप टिकटॉकसह 59 चिनी अॅप्सवर मोदी सरकारने बंदी घातली आहे. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक असल्याचे सांगत बंदी घालण्यात आली. तर दुसरीकडे देशभरात चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची मागणी जोर धरू लागली आहे. अनेकांनी तर चिनी वस्तूंचा वापर करणं बंद करून याची सुरुवात देखील केली आहे. तसेच विदेशी वस्तूंचा वापर टाळून स्वदेशी वस्तूंचा वापर करण्याचा सल्ला दिला जात आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी याच दरम्यान एक मोठं विधान केलं आहे. 'स्वदेशीचा अर्थ विदेशी वस्तूंवर सरसकट बहिष्कार टाकणं नाही' असं मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. पुस्तकांच्या उद्घाटन समारंभात त्यांनी असं म्हटलं आहे. "स्वदेशी वस्तूंचा वापर याचा अर्थ असा नाही की विदेशी वस्तूंवर सरसकट बंदी घालावी. जगभरात ज्या गोष्टी चांगल्या आहेत आणि ज्याची देशात कमतरता आहे अशा गोष्टी आयात करता येऊ शकतात" असं भागवत यांनी म्हटलं आहे.
#WATCH: ...Humari swadeshi yani videsh ka jo kuchh bhi hai sabka bahishkaar, aisa bilkul nahi hai. Humare liye jo upyukt hai, humari sharton par, hum sab lenge: RSS chief Mohan Bhagwat at a virtual book launch event (12.08.2020) pic.twitter.com/5m2GejpyrU
— ANI (@ANI) August 12, 2020
मोहन भागवत यांनी "स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या लोकांचे ज्ञान आणि क्षमता याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. अनुभवावर आधारित ज्ञानाला पुढे आणण्याची आवश्यकता आहे. विदेशी वस्तूंवर केवळ अवलंबून राहू नये. जर तसं करायचं असेल तर प्रत्येकाने आपल्या अटी आणि शर्तींवर ही गोष्ट करायला हवी" असं देखील म्हटलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, योगी आदित्यनाथ, मोहन भागवत यांनाही धोकाhttps://t.co/0MBlRi5ZYv#SakshiMaharaj#BJP#Pakistan
— Lokmat (@MiLOKMAT) August 12, 2020
प्रा. राजेंद्र गुप्ता यांच्या दोन पुस्तकांचे डिजिटल माध्यमातून उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी भागवत यांनी असं म्हटलं आहे. ज्ञानासंबंधी जगभरातू चांगले विचार आले पाहिजेत. वैश्विक कुटुंब म्हणून जग समजून घेण्याची आणि स्वावलंबनासह सद्भावनेनं सहकार्य करण्याची गरज असल्याचंही सांगितलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. ज्येष्ठ शास्त्रज्ञ व सीएसआयआरचे माजी अध्यक्ष रघुनाथ माशेलकर यांनी देखील काही दिवसांपूर्वी ‘बायकॉट चायना’ म्हटले तर ते आत्महत्या केल्यासारखे होईल असं म्हटलं आहे.
‘बायकॉट चायना’ म्हटले तर ते आत्महत्या केल्यासारखे होईल
आत्मनिर्भर भारत ही संकल्पना चांगली आहे. आपण 59 चायनीज अॅपवर बंदी घातली हे चांगले झाले. त्यातून पाच नवे भारतीय स्टार्टअप उभे राहिले. पण काही गोष्टी अशाही आहेत की त्यावर आपण ‘बायकॉट चायना’ म्हटले तर ते आत्महत्या केल्यासारखे होईल, असे स्पष्ट मत रघुनाथ माशेलकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केलं. आत्मविश्वास असल्याशिवाय आत्मनिर्भर होता येणार नाही. त्यासाठी आत्मसन्मान हवा आणि म्हणून आता मेक इन इंडियाची व्याख्याच बदलावी लागेल. आपण बाहेरून वस्तू आणून त्या इथे असेंबल करणे म्हणजे मेक इन इंडिया नाही. आपल्याला घाम गाळून मेहनत करणारेही हवे आहेत आणि नवनवीन शोध करून पैसा उभे करणारेदेखील. त्यादृष्टीने मेक इन इंडियाची व्याख्या करावी लागेल, असेही माशेलकर म्हणाले. जेनरिक उत्पादनात आपण जगात एक नंबर आहोत, पण फार्मा उद्योगाला लागणारे एपीआय (अॅक्टिव्ह फार्मासिटीकल इन्ग्रियन्टस) 70 टक्के चायनामधून येते. उद्या जर आपण बायकॉट चायना केले तर आपली फार्मा इंडस्ट्री शून्यावर येईल. त्यासाठी आपण ‘कमीतकमी चायना’ ही भूमिका घ्यावी, असेही ते म्हणाले.
CoronaVirus News : परिस्थिती गंभीर! कोरोनामुळे तब्बल 7 लाख लोकांना गमवावा लागला जीवhttps://t.co/yRQuoEpAnY#coronavirus#CoronaUpdates#COVID19
— Lokmat (@MiLOKMAT) August 13, 2020
महत्त्वाच्या बातम्या
सलाम! विद्यार्थ्यांसाठी शिक्षकाने केला तब्बल 100 किमीचा प्रवास, 13 गावांतील मुलांना दिली पुस्तकं
कडक सॅल्यूट! ...अन् गर्भवती महिलेसाठी आमदार ठरले देवदूत, डॉक्टरांच्या अनुपस्थितीत केली प्रसूती
बापरे! बाईक दिली नाही म्हणून 'तो' 100 फूट उंच विजेच्या खांबावर चढला अन्..
Corona Vacine : 20 वर्षांपासूनच्या शोधाची कमाल; रशियाकडून SputnikV वेबसाईट लाँच
भयंकर! धावत्या बसने अचानक घेतला पेट; 5 जणांचा होरपळून मृत्यू, 27 जण जखमी
"ऑपरेशन कमळ' फसले, हा राजकीय विकृतीचा पराभव', शिवसेनेचं भाजपावर टीकास्त्र
"10 दिवसांत तुम्हाला आणि तुमच्या साथीदारांना ठार करू", पाकिस्तानातून साक्षी महाराजांना धमकी