गायींना तामिळ आणि संस्कृतमध्ये बोलायला शिकवणार, स्वामींचा अजब दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2018 10:54 AM2018-09-20T10:54:59+5:302018-09-20T11:10:27+5:30
दक्षिण भारतातील स्वामी नित्यानंद यांनी एक अजब दावा केला आहे.
दक्षिण भारतातील स्वामी नित्यानंद यांनी एक अजब दावा केला आहे. माणसांप्रमाणे प्राणीही बोलू शकतील अशी भाषा आम्ही तयार करत आहोत, या भाषातंत्रामुळे गायीही तामिळ आणि संस्कृतमध्ये लवकरच बोलू शकतील असं त्यांनी म्हटलं आहे. स्वामी नित्यानंद यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. वर्षभरात मी गाय, माकड आणि इतर प्राण्यांच्या तोंडून संस्कृत आणि तामिळ भाषा वदवून घेईन असा दावा ते व्हिडीओमध्ये करत आहेत. या अजब दाव्यामुळे स्वामी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
Animals will also talk in future.....our desi guru scientist #Nityananda claims. Simply WOW!.... So we can talk to monkeys and cows in local language.#God are you Watching? pic.twitter.com/Pj9pwbJE2p
— dinesh akula (@dineshakula) September 18, 2018
माकड आणि अन्य प्राण्यांना माणसांसारखे काही ऑर्गन नसतात. आम्ही त्यांच्यासाठी अशा प्रकारचे इंनटर्नल ऑर्गन तयार करत आहे. संशोधन आणि विज्ञान मिळून एक सॉफ्टवेअर तयार केले आहे. लवकरच प्राणी आणि व्यक्तीमध्ये तामिळ किंवा संस्कृतमध्ये संभाषण होईल. सॉफ्टवेअरची टेस्ट घेतल्यानंतर मी असा दावा करत असल्याचं त्यांनी त्यांच्या आश्रमातील एका कार्यक्रमात म्हटलं आहे.