स्वामी ओमजी महाराज बिग बॉसच्या घरातून थेट तुरूंगात?
By admin | Published: October 20, 2016 05:11 PM2016-10-20T17:11:03+5:302016-10-20T17:16:07+5:30
पहिल्याच भागात घरात प्रथम शिरणारे स्पर्धक स्वामी ओमजी महाराजांनी आपल्या वाचाळपणाचा आणि कारनाम्यांचा नमुना दाखविण्यास पहिल्या दिवसापासूनच सुरुवात
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 20 - कलर्स वाहिनीवरील ‘बिग बॉस’च्या 10व्या पर्वाला सुरुवात झाली आणि सुरुवातीपासूनच अनेक नवनवीन गोष्टींच्या चर्चेला उधाण आले. पहिल्याच भागात घरात प्रथम शिरणारे स्पर्धक स्वामी ओमजी महाराज सध्या चांगलेच चर्चेत आहेत. आपल्या वाचाळपणाचा आणि कारनाम्यांचा नमुना दाखविण्यास त्यांनी पहिल्या दिवसापासूनच सुरुवात केली.
स्वामी ओमजी महाराज जरा हटके आहेत हे तर शोच्या पहिल्याच दिवशी तुम्हाला समजलं असेल, पण इतके हटके असतील हे तुम्हाला माहित नसेल. ओमजी महाराजांवर सायकल चोरी, हत्यार बाळगणे आणि चोरीच्या उद्देशाने जबरदस्ती दुस-याच्या घरात घुसण्याचा आरोप आहे. त्यांच्याविरोधात अजामिनपात्र गुन्हा दाखल करण्यात आला असून जर ते न्यायालयात हजर झाले नाही तर त्यांना लवकरच अटक करण्यात येऊ शकते. त्यामुळे बिग बॉसच्या घरातून थेट तुरूंगात त्यांची रवानगी होऊ शकते.
स्वामी ओमजी महाराजांविरोधात दिल्लीच्या साकेत न्यायालयाने अजामिनपात्र वॉरंट जारी केला आहे. त्यांच्यावर एका महिलेने चोरीच्या उद्देशाने बळजबरी घरात घुसण्याचा आरोप केला आहे. ओमजी महाराज यांचा छोटा भाऊ प्रमोद झा यांनीही त्यांच्यावर दिल्लीच्या लोधा कॉलोनीतील एका सायकल दुकानाचं कुलुप तोडून 3 लोकांसह 11 सायकल आणि अन्य महागडं सामान तसेच काही कागदपत्र चोरी करण्याचा आरोपही लावला होता.
बिग बॉस 10 च्या प्रिमियरच्या 2 दिवसांपूर्वी चोरी प्रकरणात त्यांच्याविरोधात अजामिनपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 14 ऑक्टोबरला सुनावणीदरम्यान त्यांना न्यायालयात हजर राहण्यास सांगण्यात आलं होतं. मात्र, ओमजी आणि त्यांच्याकडून कोणीही न्यायालयात उपस्थित न राहिल्याने न्यायालयाने त्यांच्याविरोधात अजामिनपात्र वॉरंट जारी केलं. याप्रकरणाची पुढील सुनावणी 8 नोव्हेंबरला होणार आहे.