Swami Prasad Maurya : 'लक्ष्मण कोणती लढाई लढण्यासाठी आला होता?' माजी मंत्री स्वामी प्रसाद मौर्य पुन्हा बरळले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2023 02:26 PM2023-02-09T14:26:48+5:302023-02-09T14:27:00+5:30
Swami Prasad Maurya : स्वामी प्रसाद मौर्य यांनी याआधीही रामचरितमानसवर वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
Swami Prasad Maurya : रामचरितमानसच्या काही श्लोकांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर आता समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस स्वामी प्रसाद मौर्य (Swami Prasad Maurya) यांनी भगवान श्री रामाचा धाकटा भाऊ लक्ष्मणावर वादग्रस्त विधान केले आहे. उत्तर प्रदेशची राजधानी लखनौचे नाव बदलून लक्ष्मणपूर करण्याच्या मागणीवर स्वामी प्रसाद मौर्य म्हणाले की, 'लक्ष्मण कोणती लढाई लढण्यासाठी आला होता?'
माजी मंत्री स्वामी प्रसाद मौर्य म्हणतात, 'लखनौ नाव खराब आहे का? भाजपवालेच म्हणतात की, हे लखनौ गंगा-जमुनी तहजीबचे केंद्र आहे. लखनौ आमच्या संस्कृतीचा वारसा आहे. लक्ष्मणाचा त्या आक्रमकांशी काय संबंध, तो कोणती लढाई लढायला आला होता? स्वातंत्र्य लढ्यात लक्ष्मण कुठेतरी दिसला होता का? भाजपचे मुंगेरीलालचे स्वप्न आहेत,' अशी टीका मौर्य यांनी केली.
रामचरितमानस की कुछ चौपाइयों के आपत्तिजनक अंश जिसमें समस्त महिलाओं, आदिवासियों, दलितों व पिछड़ों को सामाजिक, धार्मिक स्तर पर नित्यप्रति अपमानित होना पड़ता है, को संशोधित/प्रतिबंधित करने एवं पीड़ित वर्ग को सम्मान दिलाने हेतु पत्र मा. राष्ट्रपति जी व मा. प्रधानमंत्री जी को प्रेषित। pic.twitter.com/rLmuoFKgRs
— Swami Prasad Maurya (@SwamiPMaurya) February 8, 2023
मौर्य पुढे म्हणतात, 'तुम्हाला लखनौचे नाव बदलायचे असेल तर पासी समाजातील वीरांगना देवी या महिलेचे नाव का ठेवत नाही? लखन पासी हे लखनौचे राजे होते. मी रामचरितमानसच्या श्लोकांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. मोदींना मागणी करत मौर्य म्हणाले की, पंतप्रधानांनी रामचरितमानसमधील आक्षेपार्ह भाग काढून टाकावा, ज्यामध्ये महिला आणि शूद्रांचा अपमान करण्यात आला आहे.