सैनी सरकारचा १५ ऑक्टोबरला शपथविधी, PM मोदींसह भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2024 05:57 PM2024-10-11T17:57:55+5:302024-10-11T17:59:11+5:30
Haryana Government Oath Ceremony :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजप आणि एनडीए शासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीही यात सहभागी होणार आहेत.
Haryana Government Oath Ceremony : हरयाणा सरकारचा शपथविधी सोहळा मंगळवारी (१५ ऑक्टोबर) हरयाणामध्ये होणार आहे. हा शपथविधी सोहळा पंचकुला सेक्टर ५ च्या परेड ग्राऊंडवर आयोजित केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजप आणि एनडीए शासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीही यात सहभागी होणार आहेत.
शपथविधी सोहळ्यासाठी परेड ग्राऊंडमध्ये एक लाख लोकांच्या आसनक्षमतेचे नियोजन करण्यात आले आहे. भाजप आणि एनडीए शासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीही या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. याशिवाय, देशातील उद्योगपती आणि बड्या व्यक्तींनाही या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात येणार आहे.
'हे' नेते मंत्री होण्याची शक्यता
मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांच्याशिवाय १२ नेते मंगळवारी (15 ऑक्टोबर) मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात. अनिल विज, कृष्णा बेदी, कृष्णलाल पनवार, अरविंद शर्मा, कृष्णा मिड्डा, महिपाल ढांडा, मूलचंद शर्मा, लक्ष्मण यादव, राव नरबीर, सुनील संगवान, बिपुल गोयल, तेजपाल तन्वर यांना हरयाणाच्या नवीन सैनी सरकारमध्ये मंत्री केले जाऊ शकते.
नायब सिंह सैनी यांनी घेतली होती भाजप नेत्यांची भेट
विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विजयानंतर हरयाणातील नवीन सरकारचे प्रमुख म्हणून संभाव्य शपथ घेण्यापूर्वी नायब सिंह सैनी यांनी बुधवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या इतर वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली होती.
निवडणुकीत भाजपची सर्वोत्तम कामगिरी
दरम्यान, भाजपने हरयाणा विधानसभा निवडणुकीत ४८ जागा मिळवून आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली आहे, जी काँग्रेसच्या जागांच्या संख्येपेक्षा ११ जास्त आहे. काँग्रेसला ३७ जागा मिळाल्या आहेत. याशिवाय, या निवडणुकीत जेजेपी आणि आपचा सफाया झाला आणि आयएनएलडीला केवळ दोन जागा जिंकण्यात यश आले.