स्विगी देणार दीड वर्षामध्ये ३ लाख रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2019 02:21 AM2019-10-20T02:21:56+5:302019-10-20T02:23:06+5:30

फूड डिलिव्हरी करणाऱ्या स्विगी या कंपनीने आगामी दीड वर्षात ३ लाख लोकांना रोजगार देण्याचे ठरविले आहे.

 Swiggy will give 3 lakh jobs in a year and a half | स्विगी देणार दीड वर्षामध्ये ३ लाख रोजगार

स्विगी देणार दीड वर्षामध्ये ३ लाख रोजगार

Next

बंगळुरू : फूड डिलिव्हरी करणाऱ्या स्विगी या कंपनीने आगामी दीड वर्षात ३ लाख लोकांना रोजगार देण्याचे ठरविले आहे. या कंपनीकडे सध्या दोन लाखांहून अधिक लोक काम करीत असून, नव्या कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांनंतर स्विगीकडे पाच लाखांहून अधिक कर्मचारी असतील. सध्या स्विगीमध्ये २ लाख १० हजार डिलिव्हरी बॉय आहेत. याशिवाय नियमित कर्मचाºयांची संख्या आठ हजार आहे.

स्विगीचे सहसंस्थापक व सीईओ श्रीहर्ष मजेटी यांनीच ही माहिती दिली आहे. ते म्हणाले की, स्विगीचा याच पद्धतीने विस्तार होत राहिल्यास, रेल्वे व भारतीय लष्कर यानंतर सर्वाधिक रोजगार देणारी आमचीच कंपनी असू शकेल. भारतीय लष्करात १२.५० लाख जवान आहेत, रेल्वेमध्येही १२ लाखांहून अधिक कर्मचारी आहेत.

टीसीएस ही भारतातील सर्वात मोठी आयटी कंपनी असून, तिथे साडेचार लाख लोक नोकरी करतात. म्हणजेच टीसीएसपेक्षा स्विगीकडील कर्मचाºयांची संख्या अधिक असेल. मात्र, टीसीएसकडे उच्चशिक्षितांची संख्या मोठी आहे, तर स्विगीकडे फार शिक्षण नसलेल्यांनाही फूड डिलिव्हरी बॉय म्हणून रोजगार मिळू शकतो.

काय म्हणतात, स्विगीचे सीईओ?

स्विगी देशातील ५०० शहरांमध्ये फूड डिलिव्हरीचे काम करते, असे सांगून स्विगीचे सहसंस्थापक व सीईओ मजेटी म्हणाले की, आम्ही आता ओपन पॉइंट आॅफ डिस्पेन्सिंग पद्धत राबविण्याचा विचार करीत आहोत. त्यात अनेक रेस्टॉरंटस्चे संयुक्त किचन असेल. त्यामुळे आम्ही ग्राहकांना १० मिनिटांमध्ये फूड डिलिव्हरी करू शकू. देशातील १० कोटी ग्राहकांनी महिन्यात किमान १५ वेळा स्विगीच्या सेवेचा वापर करावा, यासाठीची आम्ही तयारी सुरू केली आहे. अर्थात, हे प्रत्यक्षात यायला काही वर्षे जातील.

Web Title:  Swiggy will give 3 lakh jobs in a year and a half

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.