लॉकडाऊनमध्ये बेरोजगार झाला स्विमिंग कोच; भाड्याने जमीन घेऊन केली शेती, वर्षाला 5 लाख नफा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2023 03:29 PM2023-03-21T15:29:11+5:302023-03-21T15:35:48+5:30

विजय यांनी लॉकडाऊनच्या काळात जमीन भाडेतत्त्वावर घेतली आणि त्यावर शेती सुरू केली.

swimming coach lost his job during lockdown took 20 bigha land on rent and started doing farming | लॉकडाऊनमध्ये बेरोजगार झाला स्विमिंग कोच; भाड्याने जमीन घेऊन केली शेती, वर्षाला 5 लाख नफा

लॉकडाऊनमध्ये बेरोजगार झाला स्विमिंग कोच; भाड्याने जमीन घेऊन केली शेती, वर्षाला 5 लाख नफा

googlenewsNext

कोणतंही काम मोठं किंवा छोटं नसतं, काम फक्त काम असतं. त्यासाठी काम नीट करता आलं पाहिजे. राजस्थानच्या बिकानेर येथील स्विमिंग कोच विजय शर्मा यांनी अशीच दमदार कामगिरी केली आहे. कोराना काळात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये अनेक लोक बेरोजगार झाले होते, त्यात विजय सिंह यांची देखील नोकरी गेली. पण, विजय यांनी हार मानली नाही आणि या कठीण परिस्थितीतही त्यांनी धैर्याने स्वतःला उभे केले आणि कुटुंबाचा सांभाळ केला.

विजय यांनी लॉकडाऊनच्या काळात जमीन भाडेतत्त्वावर घेतली आणि त्यावर शेती सुरू केली. आज शेती करून ते भरघोस कमाई करत आहे. विजय शर्मा यांनी सांगितले की ते शेतात मोहरी, गहू, मुळा, गवार, बटाट्याची पारंपारिक लागवड करतात. सध्या ते मोहरी, गव्हाची लागवड करत आहेत. बटाटा, मुळा, मोहरी यासह अनेक प्रकारच्या भाज्या पिकवल्यानंतर ते बाजारात विकतात, असे त्यांनी सांगितले. यामुळे त्यांना दरवर्षी पाच लाख रुपयांपर्यंतचा नफा मिळतो.

बिछवाल तलावाच्या मागे नाग्गासर येथे जमिनीत शेती करत असल्याचे विजय यांनी सांगितले. जेव्हा कोरोनाचा संसर्ग वाढला तेव्हा जलतरण तलाव बंद झाले, त्यानंतर त्यांनी शेती करण्यास सुरुवात केली. सरदार पटेल मेडिकल कॉलेजच्या स्विमिंग पूलमध्ये ते स्विमिंग शिकवायचे. कोरोनाच्या वेळी स्विमिंग पूल बंद झाल्यामुळे ते शेतीकडे वळले. हे खूप आरामदायी आहे आणि कामामध्ये देखील मजा आहे असं म्हटलं. 

शेतीत मिळतो भरपूर नफा 

विजय यांनी सांगितले की, अनेकांचा असा समज आहे की शेती करून फायदा होत नाही, तो चुकीचा आहे. शेती नीट केली तर त्यात नफा जास्त असतो, असे त्यांनी सांगितले. ही एक प्रकारची कायमस्वरूपी नोकरी आहे. यामुळे कुटुंबातील मुले आणि पत्नी आनंदी असल्याचे ते सांगतात. आजकाल बहुतेक मुलांनी शेत पाहिलेले नाही, म्हणून ते आपल्या मुलांना शेती आणि प्राण्यांची ओळख करून देतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: swimming coach lost his job during lockdown took 20 bigha land on rent and started doing farming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.