Swine Flu : धोक्याची घंटा! देशात वेगाने होतोय स्वाइन फ्लूचा प्रसार; 'ही' आहेत लक्षणं, 'असा' करा बचाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 11:22 IST2025-03-12T11:21:40+5:302025-03-12T11:22:15+5:30

Swine Flu : जानेवारीमध्ये ५०० हून अधिक लोकांना स्वाइन फ्लूची लागण झाली होती. त्याच वेळी, उपचारादरम्यान सहा जणांचा मृत्यू झाला.

Swine Flu is spreading in delhi and other states through how to take precautions | Swine Flu : धोक्याची घंटा! देशात वेगाने होतोय स्वाइन फ्लूचा प्रसार; 'ही' आहेत लक्षणं, 'असा' करा बचाव

Swine Flu : धोक्याची घंटा! देशात वेगाने होतोय स्वाइन फ्लूचा प्रसार; 'ही' आहेत लक्षणं, 'असा' करा बचाव

भारतातील आठ राज्यांमध्ये स्वाइन फ्लू म्हणजेच H1N1 व्हायरस वेगाने पसरत आहे, ज्यामध्ये दिल्ली, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडूमधील परिस्थिती गंभीर आहे. जानेवारीमध्ये ५०० हून अधिक लोकांना स्वाइन फ्लूची लागण झाली होती. त्याच वेळी, उपचारादरम्यान सहा जणांचा मृत्यू झाला. याशिवाय पुद्दुचेरी, महाराष्ट्र, जम्मू आणि काश्मीर आणि गुजरातमध्येही स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळले.

स्वाइन फ्लू हा इन्फ्लूएंझा व्हायरसचा एक प्रकार आहे, जो डुकरांपासून मानवांमध्ये पसरणारा एक प्राणघातक व्हायरस आहे, त्याला H1N1 असंही म्हणतात. २००९ मध्ये स्वाइन फ्लूचा पहिला रुग्ण आढळला होता आणि आता हा व्हायरस वेगाने पसरत आहे. केंद्र सरकारने जारी केलेल्या अ‍ॅडव्हायझरीनुसार, दिल्ली, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडूमध्ये परिस्थिती गंभीर आहे, या राज्यांमध्ये यावर्षी सर्वाधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. 

'ही' आहेत लक्षणं

H1N1 इन्फ्लूएंझा व्हायरस सुरुवातीला फक्त डुकरांनाच प्रभावित करत होता, परंतु आता तो मानवांनाही संक्रमित करत आहे. त्याची सामान्य लक्षणं म्हणजे ताप, थकवा, भूक न लागणे, खोकला, सतत घसा खवखवणं, उलट्या किंवा अतिसार. परंतु बहुतेक लोक याला सामान्य सर्दी मानतात आणि उपचारांना उशीर करतात, ज्यामुळे परिस्थिती आणखी बिकट होते.

'असा' करा बचाव

स्वाइन फ्लू टाळण्यासाठी, स्वच्छतेची काळजी घ्या. साबण आणि पाण्याने नियमितपणे हात धुवा. जर साबण उपलब्ध नसेल तर हँड सॅनिटायझर वापरा. गर्दीच्या ठिकाणी मास्क घाला, जर कोणाला खोकला किंवा सर्दी झाली असेल तर त्यांच्यापासून अंतर ठेवा. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी, जास्तीत जास्त व्हिटॅमिन सी आणि डी असलेले पौष्टिक आहार घ्या, ताजी फळं, हिरव्या भाज्या, हळदीचं दूध आणि तुळस आल्याचा चहा घ्या.

Web Title: Swine Flu is spreading in delhi and other states through how to take precautions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.