भारतीयांचा काळा पैसा ८० टक्क्यांनी घटला; मोदी सरकारला स्विस बँकेचं सर्टिफिकेट
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2018 01:50 PM2018-07-24T13:50:46+5:302018-07-24T13:51:24+5:30
एनडीएच्या काळात काळा पैशांमध्ये 80 टक्के कपात झाली आहे.
नवी दिल्ली- भारतीयांच्या काळा पैशावर स्विस बँकेनं मोठा खुलासा केला आहे. स्विस बँकेत जमा असलेला सर्वच पैसा काळा नाही. स्विस बँकेच्या BIS डेटानुसार, 2017मध्ये काळा पैशात 34.5 टक्के घट नोंदवली गेली आहे. एनडीएच्या काळात काळा पैशांमध्ये 80 टक्के कपात झाली आहे. नॉन बँक कर्ज आणि ठेवी काही प्रमाणात कमी झाल्या आहेत.
बँकेच्या माहितीनुसार, 2016मध्ये नॉन बँक कर्जाचा आकडा 80 कोटी डॉलर होता. आता 2017मध्ये त्यात घट होऊन तो 52.4 कोटी डॉलर झाला आहे. बँकेच्या माहितीनुसार, स्विस नॉन बँक कर्ज आणि ठेवींमध्ये मोठ्या प्रमाणात कपात झाली आहे. 2013पासून 2017पर्यंत यात 80 टक्के कमी नोंदवली गेली आहे. विशेष म्हणजे भारतीयांचा स्विस बँकेत 50 टक्के वाढल्याची चर्चा असताना स्विस बँकेच्या BISचा अहवाल सार्वजनिक करण्यात आला आहे. या डेटाची ब-याचदा चुकीच्या पद्धतीनं मांडणी केली जाते. कारण त्यात देवाण-घेवाणीचे व्यवहारही असतात.
नॉन डिपोझिट लायब्लिटीजमध्ये भारतातल्या स्विस बँकेच्या काही शाखांच्या कारोभाराचाही समावेश झाला होता. यात बँकांमध्ये होणा-या देवाण-घेवाणीच्या व्यवहारांचाही अंतर्भाव आहे. स्विस बँकेचे अॅम्बेसेडर एंड्रियास बॉम यांच्याकडून पीयूष गोयल यांना लिहिण्यात आलेल्या पत्रात याचा उल्लेख आहे. ब-याचदा स्विस बँकेत असलेला भारतीयांचा पैसा हा काळा असल्याची वदंता आहे, असंही डाटा बँक ऑफ इंटरनॅशनल सेटलमेंट्स (BIS)नं स्पष्ट केलं आहे. केंद्रीय अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी स्विस बँकेतील या आकड्यांचा उल्लेख राज्यसभेतही केला आहे. ते म्हणाले, स्विस बँकेत असलेला भारतीयांचा पैसा हा देशातील विविध भागांतून जमा झालेला आहे. त्यात सर्वच काळा पैसा नाही. अशा आशयाचं माझ्याकडे स्विस बँकेनं दिलेलं लेखी उत्तर आहे. स्विस बँकेत भारतीयांचा किती पैसा आहे हे जाणून घ्यायचं असल्यास बँकिंग स्टेटिक्सचाही वापर करता येऊ शकतो.