काळा पैसा ठेवण्यासाठी स्वीस बँका ही जगातील आकर्षक जागा स्वीत्झर्लंडची कबुली

By Admin | Published: June 22, 2015 01:54 AM2015-06-22T01:54:10+5:302015-06-22T01:54:10+5:30

बर्न : स्वीत्झर्लंड हा देश परदेशातील मनी लाँड्रिंगद्वारा जमा केलेली रक्कम ठेवण्यासाठी जगातील सर्वाधिक आकर्षक जागा बनला असल्याची कबुली स्वीत्झर्लंडने प्रथमच दिली आहे. मनी लाँड्रिंग व दहशतवादी कारवायांना आर्थिक मदतीचा मुकाबला करण्यासाठी आपली व्यवस्था अधिक बळकट करण्याची गरज असल्याचेही स्वीत्झर्लंडने मान्य केले आहे.

Swiss banks accept Swiss banks to keep black money | काळा पैसा ठेवण्यासाठी स्वीस बँका ही जगातील आकर्षक जागा स्वीत्झर्लंडची कबुली

काळा पैसा ठेवण्यासाठी स्वीस बँका ही जगातील आकर्षक जागा स्वीत्झर्लंडची कबुली

googlenewsNext
्न : स्वीत्झर्लंड हा देश परदेशातील मनी लाँड्रिंगद्वारा जमा केलेली रक्कम ठेवण्यासाठी जगातील सर्वाधिक आकर्षक जागा बनला असल्याची कबुली स्वीत्झर्लंडने प्रथमच दिली आहे. मनी लाँड्रिंग व दहशतवादी कारवायांना आर्थिक मदतीचा मुकाबला करण्यासाठी आपली व्यवस्था अधिक बळकट करण्याची गरज असल्याचेही स्वीत्झर्लंडने मान्य केले आहे.
भारत व इतर देशांनी स्वीस बँकांत पैसे ठेवणार्‍या नागरिकांची माहिती देण्यासाठी दबाव आणल्यानंतर स्वीत्झर्लंडने ही कबुली दिली आहे. अवैध पैसा जमा करणार्‍या नागरिकांनी आपले धन सुरक्षित ठेवण्यासाठी स्वीस बँकांच्या गोपनीयता बाळगण्याच्या नियमाचा फायदा घेतला आहे.
स्वीत्झर्लंडच्या एका उच्चस्तरीय सरकारी समितीने आपला देशही आर्थिक गुन्ह्यापासून वाचलेला नाही, असे म्हटले असून आर्थिक गुन्ह्याचा सर्वाधिक धोका येथील बँकांना आहे, असे म्हटले आहे. आर्थिक गुन्हेगारीतून निर्माण झालेला पैसा देशातील बँकांत येऊ शकतो, असे या समितीने म्हटले आहे; पण कोणत्याही देशाचे नाव घेतलेले नाही.
स्वीस बँकांनी अमेरिका व अन्य काही देशांच्या सरकारांशी अशा प्रकरणांचा निपटारा केला आहे. या देशांच्या नागरिकांनी देशात करचोरी करून पैसा स्वीस बँकांत ठेवला होता. परदेशी नागरिकांचा अवैध पैसा ठेवण्याचे आकर्षक स्थळ अशी आपल्या देशाची प्रसिद्धी झाली आहे, अशी कबुली स्वीत्झर्लंडने प्रथमच दिली आहे.
स्वीत्झर्लंडच्या फेडरल कौन्सिलची गेल्या शुक्रवारी बैठक झाली असून, या बैठकीत मनी लाँड्रिंग व दहशतवादाशी संबंधित पैशामुळे देशावर येणार्‍या जोखमीबद्दल प्रथमच चर्चा झाली. यासंदर्भात स्वीत्झर्लंडमधील उच्चस्तरीय समितीने एक अहवाल तयार केला आहे. स्वीत्झर्लंड आर्थिक गुन्हेगारीपासून सुरक्षित नाही, असा इशारा या अहवालात देण्यात आला आहे. या समितीच्या म्हणण्यानुसार स्वीत्झर्लंडच्या आर्थिक क्षेत्राला फसवणूक, गैरव्यवहार, भ्रष्टाचार व गुन्हेगारी संघटनांचा पैसा येण्याचा धोका आहे.

Web Title: Swiss banks accept Swiss banks to keep black money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.