लाचखोरीवरून सिंडिकेट बँकेचे अध्यक्ष अटकेत
By admin | Published: August 3, 2014 02:39 AM2014-08-03T02:39:38+5:302014-08-03T02:39:38+5:30
सिंडिकेट बँक या सार्वजनिक क्षेत्रतील बँकेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक एस.के. जैन आणि अन्य पाच जणांना 50 लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी अटक केली.
Next
नवी दिल्ली : सिंडिकेट बँक या सार्वजनिक क्षेत्रतील बँकेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक एस.के. जैन आणि अन्य पाच जणांना 50 लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी केंद्रीय गुप्तचर विभागाने (सीबीआय) शनिवारी अटक केली. काही अपात्र कंपन्यांना, नियमांची पायमल्ली करून, कर्ज मर्यादा वाढवून देण्यासाठी लाच घेतल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
बँकेतूनच मिळालेल्या गुप्तवार्तेवरून गेले सहा महिने जैन यांच्यावर गुपचूप निगराणी ठेवल्यानंतर त्यांना बेंगळुरू येथे अटक करण्यात आली. 5क् लाखांची लाच स्वीकारणो आणि नियम मोडणो, असे दोन स्वतंत्र गुन्हे त्यांच्याविरुद्ध नोंदविण्यात आले आहेत. ज्या दोन कंपन्यांसाठी जैन हे कर्जाची मर्यादा वाढवून देणार होते, त्या कंपन्या कोळसा खाणपट्टे वाटपातील गैरप्रकारांमध्ये सामील आहेत, हे विशेष.
जैन यांच्यासोबत ज्या अन्य पाच जणांना अटक करण्यात आली, त्यात जैन यांचा मेव्हणा व एका चार्टर्ड अकाउंटंटचा समावेश आहे. लाच म्हणून घेतलेली 5क् लाख रुपयांची रक्कमही हस्तगत करण्यात आल्याचे सीबीआयच्या सूत्रंनी सांगितले. याखेरीज सीबीआयने दिल्ली, बंगळुरू, भोपाळ व मुंबई या शहरांमध्ये 2क् ठिकाणी छापेही घातले असून, गुन्ह्याशी संबंधित कागदपत्रे व माहिती गोळा करण्याचे काम सायंकाळी उशिरार्पयत सुरू होते.