VIDEO: शिंदे गटानं नवस केलेल्या कामाख्या देवी मंदिराचा दिल्लीच्या परेडमध्ये चित्ररथ, वेधलं सर्वांचं लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2023 11:48 AM2023-01-26T11:48:49+5:302023-01-26T11:55:33+5:30
भारताच्या ७४ व्या प्रजासत्ताक दिनाचं पथसंचलन दिल्लीच्या कर्तव्य पथावर सुरू आहे.
नवी दिल्ली-
भारताच्या ७४ व्या प्रजासत्ताक दिनाचं पथसंचलन दिल्लीच्या कर्तव्य पथावर सुरू आहे. संचलनात भारताच्या सामर्थ्याचं आणि संस्कृतीचं दर्शन घडवलं जात आहे. विविधतेतील एकतेचं आणि संस्कृतीचं दर्शन घडवणाऱ्या चित्ररथांनी यावेळीही सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. यात खास करुन आसामच्या चित्ररथाची सध्या खूप चर्चा होत आहे. कारण आसामच्या चित्ररथात यावेळी कामाख्या देवीच्या मंदिराची प्रतिकृती पाहायला मिळाला.
कर्तव्य पथावरील संचलनात यावेळी एकूण २२ चित्ररथांचा समावेश होता. यात १७ राज्यांचं प्रतिनिधीत्व करणारे, तर पाच विविध मंत्रालयांच्या चित्ररथांचा समावेश होता. आसामच्या चित्ररथाची थीम यावेळी 'नायकांची आणि अध्यात्म भूमी' अशी होती. चित्ररथाच्या सुरुवातीच्या भागात सेनापती लाचित बारफुकन यांची प्रतिकृती तयार करण्यात आली होती. तर दुसऱ्या भागात सुप्रसिद्ध कामाख्या देवी मंदिराचा देखावा तयार करण्यात आला होता. आसामची संस्कृती असलेल्या बिहू नृत्याचं सादरीकरण यावेळी चित्ररथासोबत करण्यात आलं होतं.
Tableau of Assam with Bihu dance performance #KartavyaPath#RepublicDay2023pic.twitter.com/EwbSfx7qIM
— DD News (@DDNewslive) January 26, 2023
शिंदे गटानं केला होता नवस
महाराष्ट्रातील सत्तानाट्य घडत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतचे आमदार आसाममध्ये होते. त्यावेळी आमदारांनी शिंदे यांनी आमदारांसह कामाख्या देवीचं दर्शन घेतलं होतं. तसंच राज्यात सत्तास्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या आमदारांसह नवस फेडण्यासाठी कामाख्या देवीच्या मंदिराला भेट दिली होती.