तबलिगी मौलानांच्या बँक खात्यांची झडती घेणार; सर्व राज्यांकडून माहिती मागवली

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2020 01:25 AM2020-04-04T01:25:40+5:302020-04-04T06:35:11+5:30

कॉल्सवरही राहणार वॉच, १८०० जणांच्या नमुन्यांची तपासणी

Tabligi will take stock of Mulan's bank accounts; Information is requested from all states | तबलिगी मौलानांच्या बँक खात्यांची झडती घेणार; सर्व राज्यांकडून माहिती मागवली

तबलिगी मौलानांच्या बँक खात्यांची झडती घेणार; सर्व राज्यांकडून माहिती मागवली

Next

नवी दिल्ली : निझामुद्दीन तबलिगी मरकज कोरोना प्रसाराचे केंद्र बनल्याने पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. देशभरातील तबलिगी जमातीची सर्व कार्यालये, मौलानांची माहिती दिल्लीपोलिसांनी विविध राज्यांकडून मागितली आहे. प्रत्येक मौलानाचे बँक खातेही तपासले जाणार आहे. मौलानांच्या कॉल्सची तपासणीदेखील सुरू केली.

दरम्यान, निझामुद्दीन मरकजमधील धार्मिक कार्यक्रमाला हजेरी लावणाऱ्या तबलिगी जमातच्या आणखी एकाचा आज दिल्लीत कोरोनामुळे मृत्यू झाला. गेल्या चोवीस तासांत मरकजमधून आणखी ७७ रुग्णांची भर पडल्यामुळे येथील एकूण कोरोनाबाधितांची संख्या २५९ झाली आहे.

येथील हजारो लोक आपापल्या राज्यांमध्ये पोहोचले असून त्यांना स्थानबद्ध केले जात आहे. यात उत्तर प्रदेश, दिल्ली, महाराष्ट्र, अंदमान-निकोबार, आसाम, हिमाचल, तामिळनाडू, हरयाणा, जम्मू-काश्मीर, झारखंड, कर्नाटक, राजस्थान, तेलंगणा, उत्तराखंड या चौदा राज्यांचा समावेश आहे. दिल्लीपाठोपाठ तामिळनाडूतही २१० तबलिगी जमातचे भाविक पॉझिटिव्ह आढळले.

राजधानीतील एकूण ३८४ पैकी २५९ मरकजशी संबंधित आहेत. ४८ तासांमध्ये मरकजमधील तिसºया रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्लीत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता ५ झाली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली.

दोन रुग्ण व्हेंटिलेटरवर

स्थानबद्ध केलेल्या १ हजार ८१० रुग्णांचेही रक्ताचे नमुने तपासले जात आहेत. त्यामुळे रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. दिल्लीत गेल्या चोवीस तासांमध्ये ९१ रुग्णांची भर पडली असून यात मरकजशी संबंधित ७७ रुग्ण आहेत. यातील दोन रुग्ण व्हेंटिलेटरवर असून त्यांची प्रकृती नाजूक आहे.

Web Title: Tabligi will take stock of Mulan's bank accounts; Information is requested from all states

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.