राम सुतार यांना टागोर पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 06:17 AM2018-10-26T06:17:04+5:302018-10-26T06:17:12+5:30
शिल्पकलेतील मोलाच्या योगदानासाठी ज्येष्ठ शिल्पकार व पद्मविभूषणचे मानकरी राम सुतार यांना २०१६ सालचा प्रतिष्ठेचा टागोर सांस्कृतिक ऐक्य पुरस्कार जाहीर झाला आहे.
नवी दिल्ली : शिल्पकलेतील मोलाच्या योगदानासाठी ज्येष्ठ शिल्पकार व पद्मविभूषणचे मानकरी राम सुतार यांना २०१६ सालचा प्रतिष्ठेचा टागोर सांस्कृतिक ऐक्य पुरस्कार जाहीर झाला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सरन्यायाधीश न्या. रंजन गोगोई, न्या. एन. गोपाल स्वामी व भारतीय सांस्कृतिक परिषदेचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे यांच्या निवड समितीने २०१४, २०१५ आणि २०१६ च्या पुरस्कारासाठी दोन मान्यवर व एका संस्थेची निवड केली. प्रख्यात मणिपुरी नर्तक राजकुमार सिंघजीत सिंह यांची २0१४ च्या तर बांगलादेशातील छायानट सांस्कृतिक केंद्राची २0१५ च्या पुरस्कारासाठी निवड झाली. एक कोटी रुपये, मानपत्र व पदक असा हा पुरस्कार आहे.