तैवानचे खासदार येणार भारतात, चीन भडकला
By admin | Published: February 15, 2017 04:54 PM2017-02-15T16:54:22+5:302017-02-15T16:54:22+5:30
येत्या दोन दिवसांनी तैवानचं संसदीय शिष्टमंडळ भारताच्या दौ-यावर येणार आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 15 - येत्या दोन दिवसांनी तैवानचं संसदीय शिष्टमंडळ भारताच्या दौ-यावर येणार आहे. मात्र यावर चीननं आगपाखड केली असून, याचा राजनैतिक विरोध दर्शवला आहे. भारत धूर्तपणे तैवानशी संबंधित मुद्द्याला हात घालत असल्यानं त्याचा भारत आणि चीनच्या संबंधांवर परिणाम होऊ शकतो, असा इशारा चीननं दिला आहे.
भारत तैवान कार्डशी खेळत आहे, मात्र ते आगीसोबत खेळण्यासारखंच आहे. आम्ही अशी आशा करतो की, भारत चीनच्या एक चीन धोरणाचा आदर करेल. तसेच तैवानशी संबंधित मुद्द्याला भारत हुशारीनं हाताळेल. जेणेकरून भारत आणि चीनमधल्या विकासावर त्याचा परिणाम होणार नाही, असं वक्तव्य चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते जेंग शाँग केलं आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या चीनविरोधातील धोरणामुळे तो आधीच सतर्क झाला आहे. ट्रम्प यांची प्रतिस्पर्ध्याला हाताशी धरून करणा-या राजकारणाची काहीशी चीनला भीती वाटते. चीन तैवान देशाला स्वतःचाच एक भाग मानतो, तसेच चीनचे तैवानशी राजकीय संबंध आहेत. भारताच्या वन इंडिया पॉलिसीला चीनचं समर्थन मिळावं यासाठी वन चायना पॉलिसीचा भारत उपयोग करू शकतो, असंही काही जाणकारांचं म्हणणं आहे.