Taj Mahal Controversy: ‘ताज’च्या बंद खोल्यांमध्ये कोणतेही रहस्य नाही: एएसआय; जानेवारीतच छायाचित्रे प्रसिद्ध
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2022 05:38 AM2022-05-17T05:38:50+5:302022-05-17T05:39:51+5:30
वस्तुनिष्ठ इतिहास शोधण्यासाठी २२ बंद खोल्या उघडण्याचा सरकारला आदेश द्यावा, अशी केलेली याचिका लखनऊ खंडपीठाने फेटाळून लावली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : ताजमहालच्या तळघरातील २२ बंद खोल्यांपैकी काहींची छायाचित्रे आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाने (एएसआय) अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निकालाआधीच जानेवारी महिन्यात प्रसिद्ध केली होती. त्यांत कोणतेही रहस्य दडलेले नाही. या खोल्या ताजमहालच्या संरचनेचा केवळ एक भाग असून त्या फारशा महत्त्वाच्या नाहीत असे एएसआयने म्हटले आहे.
वस्तुनिष्ठ इतिहास शोधण्यासाठी २२ बंद खोल्या उघडण्याचा सरकारला आदेश द्यावा अशी केलेली याचिका लखनऊ खंडपीठाने १२ मे रोजी फेटाळून लावली. भाजपच्या अयोध्या विभागाचे प्रसारमाध्यम कक्षाचे प्रमुख रजनीश सिंह यांनी ही याचिका दाखल केली होती. ताजमहाल हे पूर्वीचे शिवमंदिर असून ते तेजोमहालय नावाने ओळखले जात होते. त्यामुळे या वास्तूचा खरा इतिहास समोर आला पाहिजे असे या याचिकेत म्हटले होते.