Taj Mahal Controversy : जगद्गुरू परमहंस यांना ताजमहालमध्ये प्रवेश नाकारला; भगव्या कपड्यांमुळे रोखल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2022 02:30 PM2022-04-27T14:30:25+5:302022-04-27T14:30:58+5:30

"ताजमहालच्या इतिहासासंदर्भात जगाला चुकीची माहिती देण्यात आली आहे. ताजमहाल हे खरे तर भगवान शिव शंकरांचे मंदिर आहे, हे पूर्वी तेजोमहालय म्हणून ओळखले जात होते."

Taj Mahal Controversy jagatguru paramhans stop to enter in taj mahal by security personal; Accused of prohibited due to saffron clothes | Taj Mahal Controversy : जगद्गुरू परमहंस यांना ताजमहालमध्ये प्रवेश नाकारला; भगव्या कपड्यांमुळे रोखल्याचा आरोप

Taj Mahal Controversy : जगद्गुरू परमहंस यांना ताजमहालमध्ये प्रवेश नाकारला; भगव्या कपड्यांमुळे रोखल्याचा आरोप

Next

आग्रा येथील जगप्रसिद्ध ताजमहालवरून (Taj mahal) आता एक नवाच वाद समोर आला आहे. अयोध्येतील जगद्गुरू परमहंस आचार्य (Jagatguru Paramhans Acharya) यांना ताजमहालमध्ये प्रवेश नाकारण्यात आल्याची घटना घडली आहे. परमहंस आचार्य हे आपल्या तीन शिष्यांसह ताजमहाल पाहण्यासाठी आले होते. मात्र, त्यांना रोखण्यात आले. 

ब्रह्मदंडासह जाण्याची होती इच्छा... -
यासंदर्भात, भगवे वस्त्र परिधान केले असल्याने, सुरक्षा कर्मचाऱ्यांनी आपल्याला ताजमहाल परिसरात जाण्यापासून रोखले, असा आरोप जगद्गुरु परमहंस यांनी केला आहे. मात्र, जगद्गुरु परमहंस यांच्याकडे लोखंडाचा ब्रह्म दंड असल्याने त्यांना प्रवेश देण्यात आला नाही, असे येथील एएसआय अधीक्षण राजकुमार पटेल यांनी म्हटले आहे.

सुरक्षा कर्मचाऱ्यांनी जगद्गुरूंना ब्रह्मदंड जमा करून आत जाण्यास सांगितले. मात्र, ब्रह्मदंड सोडून ताजमहालमध्ये जाण्यास जगद्गुरूंनी नकार दिला. यानंतर, महंत परमहंस आचार्य यांनी तेथे उपस्थित असलेल्या शिष्यांना आशीर्वाद दिला आणि ते तेथून निघून गेले.

'ताजमहाल खरे तर भगवान शिव शंकरांचे मंदिर' -
दरम्यान, परमहंस आचार्य यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात त्यांनी आरोप केला आहे, की येथे एका विशिष्ट धर्माच्या लोकांनाच अधिक महत्त्व दिले जाते. व्हिडिओमध्ये ते म्हणातात, ताजमहालच्या इतिहासासंदर्भात जगाला चुकीची माहिती देण्यात आली आहे. ताजमहाल हे खरे तर भगवान शिव शंकरांचे मंदिर आहे, हे पूर्वी तेजोमहालय म्हणून ओळखले जात होते.

ताजमहाल परिसरात कुठल्याही प्रकारच्या धार्मिक कार्यांवर पूर्णपणे बंदी आहे. येथे असलेल्या मशिदीत केवळ शुक्रवारी नमाज पठण करण्याची परवानगी दिली जाते.

Web Title: Taj Mahal Controversy jagatguru paramhans stop to enter in taj mahal by security personal; Accused of prohibited due to saffron clothes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.